28 April 2024 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

Gold Rate Today | बापरे! आज सोनं महाग झालं, 2024 मध्ये सोन्याचे दर होणार इतके महाग, आजचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | गेल्या आठवड्यात देशातील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. पण चालू वर्षात म्हणजेच 2024 मध्ये सोन्याचे दर झपाट्याने वाढू शकतात, असे तज्ज्ञ सांगत आहेत. अशापरिस्थितीत सध्या सोन्याचे दर काय आहेत आणि 2024 मध्ये सोने किती महाग होऊ शकते हे जाणून घेऊया.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,624 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर सोमवारी सोन्याचा भाव 62512 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे आठवड्यात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 112 रुपयांनी वधारून बंद झाला.

आज चांदीचा दर किती?
तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचा भाव 70638 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा हा दर सोमवारी 70417 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे आठवडय़ात चांदीचा दर प्रति किलो २२१ रुपयांनी वधारून बंद झाला.

सोने-चांदीचे आतापर्यंतचे उच्चांकी दर
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा सुमारे 828 रुपये प्रति 10 ग्रॅम ने स्वस्त आहे. २८ डिसेंबर २०२३ रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली. त्या दिवशी सोन्याचा भाव 63452 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर चांदी अजूनही 6296 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

2024 मध्ये सोन्याचे दर किती महाग होऊ शकतात
तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो.

* ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
* एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
* मोतीलाल ओसवाल यांच्या म्हणण्यानुसार, 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते.
* एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

कॅरेटनुसार आठवड्याभरात सोन्याच्या दरात किती बदल झाला?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 36635 रुपयांवर बंद झाला. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 66 रुपयांनी वधारून बंद झाला.

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर 46968 रुपयांच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 84 रुपयांनी वधारला.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर 57364 रुपये आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 103 रुपयांनी वधारून बंद झाला.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 62373 रुपयांच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 111 रुपयांनी वधारून बंद झाला.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
शुक्रवारी 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 62624 रुपयांच्या पातळीवर आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत हा दर 112 रुपयांनी वधारला.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check Details 11 February 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(202)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x