 
						IPO Watch | युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कंपनी आयपीओ २३ डिसेंबर ते २६ डिसेंबर दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओ शेअर प्राइस बँड ७४५ ते ७८५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओ’मध्ये गुंतवणूकदारांना एका लॉट मध्ये १९ शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४, ९१५ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
कंपनी आयपीओ’मार्फत ५०० कोटी रुपयांचा निधी उभारणार
युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या आयपीओ’मार्फत ५०० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. युनिमेक एरोस्पेस कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ३२ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. तर OFS अंतर्गत युनिमेक एरोस्पेस कंपनी 250 कोटी रुपयांचे 32 लाख शेअर्स जारी करणार आहे. युनिमेक एरोस्पेस कंपनी आयपीओ शेअर बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्यात येणार आहे.
आयपीओची ग्रे-मार्केटमध्ये स्थिती
युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये सकारात्मक संकेत देत आहे. इन्व्हेस्टर्स गेन डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार, ग्रे-मार्केटमध्ये कंपनीचा आयपीओ शेअर सध्या ४२५ रुपयांवर ट्रेड करतोय. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी जीएमपीमध्ये २० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओमध्ये ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तर, रिटेल गुंतवणूकदारांसाठी किमान ३५% हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% हिस्सा राखीव ठेवण्यात येणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		