5 May 2025 12:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SCSS Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच-फायदा, 12 लाख रुपये व्याज आणि 42 लाख रुपये परतावा मिळेल Post Office Scheme | कमाल आहे, ही योजना गुंतवणुकीवर देईल 40,68,209 रुपये परतावा आणि प्लस महिना 24,000 रुपये उत्पन्न HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC
x

IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | गुरुवार 26 डिसेंबर 2024 रोजी स्टॉक मार्केटमध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्समध्ये २०० अंकांच्या वाढ झाली होती. तर स्टॉक मार्केट निफ्टी देखील १०० अंकांच्या तेजीसह ट्रेड करत होता. तसेच बँक निफ्टी देखील ५०० अंकांनी वधारला होता. गुरुवारी बँकिंग शेअर्समध्ये तेजी आल्याने बँक निफ्टीला मजबूत सपोर्ट मिळत होता. दरम्यान, स्टॉक तज्ज्ञांनी ३ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

Raymond Lifestyle Share Price – NSE: RAYMONDLSL

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रेमंड लाइफस्टाइल लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने रेमंड लाइफस्टाइल कंपनी शेअरसाठी ३००० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. हा शेअर सध्या 2,047.05 रुपयांवर ट्रेड करतोय. रेमंड लाइफस्टाइल शेअरचा उच्चांकी स्तर 3,100 रुपये होता. त्या उच्चांकी स्तरावरून हा शेअर जवळपास ३५ टक्क्यांनी घसरला आहे. म्हणजेच रेमंड लाइफस्टाइल शेअर गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ५०% परतावा देऊ शकतो. रेमंड लाइफस्टाइल शेअरने २२ नोव्हेंबर रोजी १९१८ रुपयांची नीचांकी पातळी गाठला होती.

Solar Industries Share Price – NSE: SOLARINDS

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सोलर इंडस्ट्रीज शेअरसाठी ‘NEUTRAL’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी सोलर इंडस्ट्रीज शेअरसाठी 12,000 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सोलर इंडस्ट्रीज शेअर सध्या 10,167.10 रुपयांवर ट्रेड करतोय. म्हणजेच सोलर इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा देऊ शकतो. सोलर इंडस्ट्रीज शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक स्तर 13,298 रुपये होता आणि नीचांकी स्तर 6,275 रुपये होता. 2024 मध्ये आतापर्यंत सोलर इंडस्ट्रीज शेअरने 50 टक्के परतावा दिला आहे.

IRFC Share Price

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना शेअर बाजार तज्ज्ञांनी आयआरएफसी कंपनी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. विश्लेषकांच्या मते आयआरएफसी कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. आयआरएफसी कंपनी शेअर चार्टवर बॉटम-आऊट फॉर्मेशन तयार होतोय. तज्ज्ञांच्या मते आयआरएफसी शेअरला २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर रेझिस्टन्सचा सामना करावा लागतोय. ‘हाय बॉटम फॉर्मेशन’ आणि साप्ताहिक चार्टवर सुद्धा उलटफेर दिसून येतील असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. इथून आयआरएफसी कंपनी शेअरमध्ये मजबूत तेजी दिसून येईल. त्यांनतर आयआरएफसी कंपनी शेअर १९० ते २०० रुपयांपर्यंत वाढू शकतो असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Thursday 26 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(136)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या