 
						Post Office Interest Rate | पोस्टाच्या सर्वच योजना गुंतवणूकदारांच्या मनपसंतीस उतरल्या आहेत. दरम्यान नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून पोस्टाचे नवे व्याजदर निश्चित होणार आहेत. ज्याचा गुंतवणूकदारांना बंपर फायदा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया पोस्टाची कोणती योजना नव्या वर्षात किती व्याजदर देणार आहे.
पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट : 
ज्या व्यक्तींना स्वतःची जमा असलेली रक्कम सुरक्षित ठेवायची आहे त्यांच्यासाठी ‘पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. या योजनेचे नवे व्याजदर वर्षाला 4% एवढे आहे. तुम्ही या योजनेमध्ये कमीत कमी 500 रुपये गुंतवू शकता. दरम्यान जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये. वरिष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशी ठरते कारण की, यामध्ये 50,000 रुपये जमा रक्कमेचे व्याज हे करमुक्त असते.
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट अकाउंट :
पोस्ट ऑफिस योजनेची टाईम डिपॉझिट योजना देखील गुंतवणूकदारांसाठी अत्यंत खास योजना ठरू शकते. ही योजना हुबेहूब बँकेमध्ये एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणे असते. योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. एका वर्षासाठी तुम्हाला 6.9% व्याजदर मिळते. दोन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी 7.0%, तीन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी 7.1% तर, पाच वर्षांच्या एकूण गुंतवणुकीसाठी तुम्हाला 7.5% एवढे व्याजदर दिले जाते.
सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम :
ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी ही योजना बनवली गेली आहे. योजनेचे सर्वाधिक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना तुम्हाला वार्षिक दरावर 8.2% व्याजदर प्रदान करते. या योजनेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे. तुम्हाला ही योजना पुढे सुरू ठेवायची असेल तर 3 वर्षांपर्यंत वाढवता येते. पोस्टाच्या सीनियर सिटीजनमध्ये तुम्ही 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता. यावर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील मिळतो.
मंथली इनकम अकाउंट स्कीम :
बऱ्याच गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला पगाराएवढी एक ठराविक रक्कम हवी असते. अशा व्यक्तींसाठी पोस्टाची मंथली इन्कम अकाऊंट योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. योजनेचे व्याजदर 7.4% प्रति वर्ष आहे. ही योजना पाच वर्षांची असून तुम्ही सिंगल खात्यात 9 लाख तर, जॉईंट खात्यामध्ये 15 लाखांची रक्कम गुंतवू शकता. तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाचे पेमेंट मासिक आधारावर केले जाते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र :
काही व्यक्तींना कमी पैसे जमा करून दीर्घकाळासाठी गुंतवणूक सातत्याने सुरू ठेवायची असते. अशा व्यक्तींसाठी ‘राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र’ ही योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते. योजनेचे व्याजदर प्रतिवर्ष 7.7% आहे. तर, ही योजना पाच वर्षांची असून कमीत कमी 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू होते. तुम्हाला या योजनेमध्ये कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ अनुभवायला मिळतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त पैसे गुंतवणुकीची कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		