
IREDA Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही स्टॉक मार्केटमध्ये खरेदीचा मूड पाहायला मिळाला. एनएसई निफ्टीमध्ये जवळपास १२५ अंकांची वाढ होऊन तो २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत मिळत आहेत.
इरेडा कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर 0.095 टक्क्यांनी वाढून 221.55 रुपयांवर पोहोचला होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 310 रुपये होता, तर इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 100.20 रुपये होता. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 59,574 कोटी रुपये आहे.
कर्ज मंजुरी आणि आऊटस्टँडिंग बुकमध्ये प्रचंड वाढ
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने दिलेल्या अपडेटनुसार, तिसऱ्या तिमाहीत इरेडा कंपनीच्या कर्ज मंजुरीत १२९ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३१,०८७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचे आऊटस्टँडिंग लोन बुक आता ६९,००० कोटी रुपयांवर पोहोचले असून, त्यामध्ये वार्षिक आधारावर ३६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
इरेडा कंपनीचे सप्टेंबर अर्थिक तिमाही निकाल
आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने ३८८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २८५ कोटी रुपयांवर होता. तसेच इरेडा कंपनीला कामकाजातून मिळणारे उत्पन्न १,६२९ कोटी रुपयांवर पोहोचले असून त्यात एकूण ३८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तिमाही आधारावर इरेडा कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा ‘PAT’ ३८४ कोटी रुपयांवरून १ टक्क्यांनी वाढला असून, महसुलात ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरने 10.58% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 8.63% परतावा आहे. मागील ६ महिन्यात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअरने 7.89% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 114.06% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 1.97% घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये इरेडा शेअरने गुंतवणूकदारांना 256.18% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.