
IPO investment| आपण ज्या शेअर बद्दल चर्चा करत आहोत तो ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिमिटेडचा शेअर मंगळवारी ग्रे मार्केटमध्ये 65 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होता. यापूर्वी सोमवारी ग्रे मार्केटमध्ये ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसच्या शेअर्सची किंमत 70 रुपये प्रीमियमवर होती.
जर तुम्ही IPO मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल 24 ऑगस्टला आणखी एका कंपनीचा IPO बाजारात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. ही कंपनी आहे ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिमिटेड. 26 ऑगस्ट 2022 पर्यंत या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला ठेवला जाईल. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस IPO ची किंमत 308-326 रुपये ठरवण्यात आली आहे. या कंपनीचा आयपीओ अद्याप सबस्क्रिप्शनसाठी खुला झालेला नाही, परंतु ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअरने धमाकेदार एंट्री केली आहे.
ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 65 रुपये प्रीमियम :
ग्रे मार्केटमध्ये ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत 65 रुपये प्रीमियम आहे. मार्केट वॉचर्सचे म्हणणे आहे की ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिमिटेडचे शेअर्स मंगळवारी ग्रे मार्केटमध्ये 65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यापूर्वी सोमवारी ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचे शेअर्स ग्रे मार्केट मध्ये 70 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनी ही एअरपोर्ट सर्व्हिस एग्रीगेटर प्लॅटफॉर्म प्रदान करते. हे शेअर्स 6 सप्टेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील.
31 मार्च 2022 पर्यंत या कंपनीच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसकडे कार्ड नेटवर्क आणि कार्ड प्रोवायडर सह 50 क्लायंट होते. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेसचा IPO हा 1.72 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल असेल. IPO साठी बोली लावणारे लोक काही ठराविक लॉटमध्ये अर्ज करू शकतात. कंपनीच्या शेअरच्या 1 लॉटमध्ये 46 शेअर्स दिले जातील. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2017 मध्ये तब्बल 98.7 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता, जो आर्थिक वर्ष 2020 मध्ये वाढून 367.04 कोटी रुपये झाला आहे. IPO च्या वाटपाची तात्पुरती तारीख 1 सप्टेंबर 2022 जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.