 
						Ashok Leyland Share Price | गुरुवारी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. या तेजी दरम्यान अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीचा डिसेंबर महिन्यातील वाहन विक्रीचा रिपोर्ट समोर आला आहे. याचा सकारात्मक परिणामी अशोक लेलँड शेअरवर दिसून आला आहे. गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी अशोक लेलँड शेअर 5.06 टक्क्यांनी वाढून 234.09 रुपयांवर पोहोचला होता.
अशोक लेलँड कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर 5.04 टक्क्यांनी वाढून 234.04 रुपयांवर पोहोचला होता. अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 264.65 रुपये होता, तर अशोक लेलँड लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 157.55 रुपये होता. अशोक लेलँड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 68,729 कोटी रुपये आहे.
अशोक लेलँड कंपनी वाहनांच्या विक्रीत तेजी
अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने डिसेंबरमधील वाहन विक्रीसंबंधीत आकडेवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अशोक लेलँड कंपनीने म्हटले आहे की, वार्षिक आधारावर अशोक लेलँड कंपनीची एकूण विक्री 5 टक्क्यांनी वाढून 16957 युनिट्स झाली आहे, जी 1 वर्षापूर्वी डिसेंबर 2023 महिन्यात 16154 युनिट्स इतकी होती. तसेच देशांतर्गत विक्रीच्या आकडेवारीनुसार, अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2024 मध्ये 15713 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, जी 2023 च्या डिसेंबरमधील 15153 युनिट्सच्या तुलनेत 4 टक्के वार्षिक वाढीसह आहे.
अशोक लेलँड शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात अशोक लेलँड कंपनी शेअरने 5.43% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 1.84% परतावा आहे. मागील ६ महिन्यात अशोक लेलँड कंपनी शेअर 0.20% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 29.62% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 6.12% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात अशोक लेलँड शेअरने गुंतवणूकदारांना 179.38% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 10,248.23% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		