
Tata Motors Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये मजबूत तेजी दिसून आली होती. गुरुवारी निफ्टी वाढून 24200 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्स जवळपास 1459 अंकांनी वाढला होता.
टाटा मोटर्स शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर 2.08 टक्क्यांनी वाढून 764.85 रुपयांवर पोहोचला होता. टाटा मोटर्स कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 1,179 रुपये होती, तर टाटा मोटर्स शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 717.70 रुपये होती. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,81,588 कोटी रुपये आहे.
टाटा मोटर्स शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट विश्लेषक निर्मल बंग यांनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. निर्मल बंग यांनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 920 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच गुंतवणूकदारांना 670 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. निर्मल बंग यांच्या मते टाटा मोटर्स शेअर सध्याच्या पातळीपेक्षा 25 टक्के परतावा देऊ शकतो.
टाटा मोटर्स शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा मोटर्स कंपनी शेअरने 1.45% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा मोटर्स शेअर 3.19% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 22.06% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा मोटर्स शेअर 2.49% घसरला आहे. मागील ५ वर्षात टाटा मोटर्स शेअरने 300.24% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 2,310.49% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर टाटा मोटर्स शेअर 3.23% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.