3 May 2024 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल PSU Stocks | मल्टिबॅगर सरकारी कंपनीच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राइस मालामाल करणार Yes Bank Share Price | येस बँक शेअरच्या टेक्निकल चार्टनुसार तेजीचे संकेत, मागील 6 महिन्यात 62% परतावा दिला Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड BHEL Share Price | PSU शेअर सुसाट तेजीत, 1 वर्षात 258% परतावा दिला, अजून एक सकारात्मक अपडेट Tata Motors Share Price | 1 वर्षात 109% परतावा देणाऱ्या टाटा मोटर्स शेअर्समध्ये घसरण, पुढे नुकसान की फायदा?
x

GRM Overseas Share Price | कुबेर पावतो असा शेअर! कधी 6700 टक्के परतावा, कधी 955% तर कधी 615% परतावा मिळतोय

GRM Overseas Share Price

GRM Overseas Share Price | जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.48 टक्क्यांच्या घसरणीसह 188 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1130 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 436.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 159 रुपये होती.

मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता, मात्र आज या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. जीआरएम ओव्हरसीज कंपनी तांदूळ आणि मसाल्यांचा व्यवसाय करते. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 191.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 3 वर्षांत जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 615 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 955 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6700 टक्के परतावा कमावून दिला आहे.

जीआरएम ओव्हरसीज कंपनी आपल्या तांदळाच्या विविध जातींचे उत्पादन आणि विक्री करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीच्या तांदळाच्या वाणांमध्ये पारंपारिक बासमती तांदूळ, सुपर बासमती, 1121 सुपर बासमती, लांब धान्य तांदूळ, शरबती तांदूळ आणि सुगंधी तांदूळ सामील आहेत.

नुकताच जीआरएम ओव्हरसीज कंपनीने सेबीला कळवले होते की, जीआरएम ओव्हरसीज कंपनीने GRM फूड क्राफ्ट कंपनीमधील आपले तीन टक्के भाग भांडवल एका व्हेंचर कॅपिटल फंडाला विकले आहेत. जीआरएम फूड क्राफ्ट कंपनी देशांतर्गत आणि बाजारपेठेत किराणा ब्रँड्ससह व्यवसाय करते. सध्या जीआरएम ओव्हरसीज कंपनी आपल्या व्यावसायिक कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी योजनांवर काम करत आहे. फूड क्राफ्ट ही एक उदयोन्मुख कंपनी आहे जी किरकोळ विक्री आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढविण्यावर काम करते.

जीआरएम फूड क्राफ्ट ही कंपनी विविध प्रकारचे बासमती तांदूळ, गव्हाचे पीठ, बेसन, दलिया आणि मसाले इत्यादीं ब्रँड्सची विक्री करण्याचा व्यवसाय करते. सध्या जीआरएम ओव्हरसीज कंपनीकडे हिमालय, तनुष आणि 10 विविध ब्रँड आहेत. GRM फूड क्राफ्ट कंपनी हैदराबाद बिर्याणी, वन पॉट मुरादाबादी बिर्याणी, मुघलाई मलाई बिर्याणी, दिंडीगुल बिर्याणी, अवधी बिर्याणी, लखनौ बिर्याणी यांसारखी प्रसिद्ध उत्पादने बावण्याचा व्यवसाय करते. GRM फूड क्राफ्ट ऑनलाइन आणि ऑफलाइन किरकोळ बाजारांसह D2C विभागात देखील कार्यरत आहे.

जीआरएम ओव्हरसीज कंपनी आपल्या 1.6 लाख किराणा दुकानांद्वारे 1.3 अब्ज ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचणारी 52 पेक्षा जास्त वितरण केंद्रे हाताळते. जीआरएम ओव्हरसीज कंपनीची स्थापना 1974 साली झाली होती. आणि मागील पाच दशकात या कंपनीने आपल्या व्यवसायात प्रचंड वाढ केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GRM Overseas Share Price NSE 11 December 2023.

हॅशटॅग्स

#GRM Overseas Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x