
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया फार्मा फंडाची रेग्युलर प्लॅन ही म्युच्युअल फंड मार्केटमधील 20 वर्षे जुनी योजना आहे. या २० वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेने परतावा देण्यात इतर सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांना मागे टाकले आहे. म्हणजेच 20 वर्षांत एसआयपी परतावा देण्यात हा फंड अव्वल आहे.
20 वर्षांत सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) करणाऱ्यांना या फंडाने सुमारे 20 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर, लाँच झाल्यापासून फंडाचा एकरकमी गुंतवणुकीवरील परतावा वार्षिक 21 टक्क्यांहून अधिक राहिला आहे. 20 वर्षांहून अधिक जुनी असलेल्या या योजनेमुळे एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना दरमहा 5000 रुपयांची बचत करून कोट्यधीश बनवले आहे. आज ते सव्वा कोटी रुपयांच्या फंडाचे मालक झाले असते.
Nippon India Pharma Fund AUM
निप्पॉन इंडिया फार्मा फंड 5 जून 20024 रोजी सुरू झाला. म्हणजेच त्याला 20 वर्षे पूर्ण झाली असून येत्या जूनमध्ये त्याला 21 वर्षे पूर्ण होतील. इक्विटी फार्मा प्रकारात समाविष्ट असलेल्या या योजनेत गुंतवणूकदारांचे सुमारे 97 टक्के फंड इक्विटी किंवा इक्विटीशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवले जातात. 30 नोव्हेंबर 2024 अखेर या फंडाची एकूण मालमत्ता 8638 कोटी रुपये होती. तर रेग्युलर प्लॅनचे खर्च गुणोत्तर 1.81 टक्के होते. शैलेश राज भान हे या योजनेचे फंड मॅनेजर आहेत. या योजनेत एकरकमी 5000 रुपये आणि कमीत कमी 100 रुपयांच्या एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते.
निप्पॉन इंडिया फार्मा फंड: एसआयपी कामगिरी
* 20 वर्षांत एसआयपीचा वार्षिक परतावा : 19.89%
* मासिक एसआयपी रक्कम: 5000 रुपये
* 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक : 12,00,000 रुपये (12 लाख रुपये)
* 20 वर्षांनंतर एसआयपी व्हॅल्यू : 1,22,15,062 रुपये (सुमारे 1.22 कोटी रुपये)
निप्पॉन इंडिया फार्मा फंड : एकरकमी कामगिरी
* योजनेची सुरुवात : 5 जून 2004
* लाँचिंगनंतर एकरकमी परतावा : 21.15 टक्के वार्षिक
* लाँचिंगच्या वेळी एकरकमी गुंतवणूक : 1 लाख रुपये
* 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य : 51,08,180 रुपये (सुमारे 51 लाख रुपये)
* 1 वर्षाचा परतावा : 35.25%
* 3 वर्ष परतावा : 18.94% वार्षिक
* 5 वर्षांचा परतावा : 27.44% वार्षिक
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.