
Post Office Scheme | पोस्टाच्या सर्वच योजना अतिशय विश्वासहार्य असतात. बऱ्याच व्यक्ती पोस्टाच्या विविध योजनांमध्ये आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी गुंतवणूक करतात. आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या आरडीमध्ये, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये त्याचबरोबर पोस्टाच्या पीपीएफ अकाउंटमध्ये आपले पैसे गुंतवले आहेत.
पोस्टाच्या खात्यांमध्ये तुम्हाला चांगल्या व्याजदराची 100% हमी मिळते. दरम्यान या इतर योजनांपेक्षा पोस्टाची आणखीन एक भन्नाट योजना आहे. जे कमी कालावधीत तुम्हाला दुप्पटीने पैसे वाढवून देण्यास उपयुक्त ठरते. या योजनेत एवढी क्षमता आहे की, 5 लाख रुपयांचे 15 लाख तयार होते. चला तर मग जाणून घेऊया पोस्टाच्या या भन्नाट योजनेविषयी संपूर्ण माहिती.
पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट :
‘पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटि’ योजना त्या गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायद्याची आहे ज्यांना कमी काळात लाखोंच्या पटीने पैसे वाढवायचे आहेत. पोस्टाच्या टर्म डिपॉझिटला पोस्ट ऑफिस एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट असे देखील म्हटले जाते. पोस्टाची ही एफडी 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर परतावा देण्यास मागेपुढे पाहत नाही. अशाच पद्धतीने बंपर परतावा मिळवून तुम्ही लक्षाधीश होऊ शकता.
5 लाखांचे 15 लाख रुपये कसे तयार होतील जाणून घ्या :
5 लाख रुपयांचे 15 लाखांत रूपांतर करण्यासाठी तुम्हाला, पोस्टाच्या एफडीमध्ये 5 लाखाची रक्कम गुंतवायची आहे. पोस्टाची एफडी तुम्हाला 7.5% दराने व्याजदर प्रदान करेल. म्हणजेच 5 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडपर्यंत तुम्ही गुंतवलेली रक्कम 7,24,974 एवढी होईल. ही रक्कम खात्यामधून न काढता तुम्हाला आणखीन 5 वर्षांसाठी गुंतवायची आहे.
आणखीन पाच वर्ष म्हणजेच तुम्ही एकूण 10 वर्ष 5 लाखांची रक्कम गुंतवता. याचाच अर्थ असा की तुम्ही व्याजदराने 5,51,175 रुपये कमवता आणि तुमच्या हातात येणारी फायनल रक्कम 10,51,175 एवढी असेल. आता जमा झालेली रक्कम तुम्हाला आणखी 5-5 वर्षांच्या हिशोबाने गुंतवावी लागेल. म्हणजेच 15 व्या वर्षी मॅच्युरिटी काळात तुम्ही केवळ व्याजस्वरूपी 10,24,149 रुपये कमवाल आणि तुम्हाला संपूर्ण मिळणारी रक्कम 15,24,149 रुपये असेल. याचाच अर्थ असा की तुम्हाला 5 लाखांचे 15 लाख करायचे असतील तर, तुम्हाला केवळ मुदतवाढ करून घ्यावी लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.