 
						IREDA Share Price | बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक तेजीने झाली होती. स्टॉक मार्केट बीएसई सेन्सेक्स 380 अंकांच्या तेजीसह 76,900 वर पोहोचला होता. तर निफ्टी 90 अंकांच्या तेजीसह 23,266 वर पोहोचला होता. या तेजीत इरेडा शेअर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी तेजीचे संकेत देताना टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केली आहे.
इरेडा कंपनीची क्यूआयपी आणण्याची योजना
इरेडा लिमिटेड कंपनी सीएमडी प्रदीप कुमार दास यांनी अपडेट देताना सांगितले की, ‘इरेडा कंपनी लवकरच क्यूआयपी आणण्याची योजना आखत आहे. इरेडा संचालक मंडळाने ४५०० कोटी रुपये उभारण्याच्या योजनेला अधिकृत मंजुरी दिली आहे. क्यूआयपीच्या माध्यमातून इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीतील आपला हिस्सा ७५ टक्क्यांवरून ठराविक टक्क्यांपर्यंत कमी करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या निधीमार्फत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीचा भांडवली आधार मजबूत करणे, ज्यामुळे कंपनी अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर अधिक वेगाने काम करण्यास सक्षम होईल असं प्रदीप कुमार दास यांनी सांगितलं.
शेअर बाजार विश्लेषक कुणाल यांनी इरेडा कंपनी शेअर खूपच फायद्याचा असल्याचे म्हटले आहे. भारतीय नवीकरणीय ऊर्जा संबंधित क्षेत्रात इरेडा कंपनी महत्वाची भूमिका बजावणार आहे. शॉर्ट टर्म मध्ये या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. तसेच केंद्र सरकार ज्या पद्धतीने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहे, त्यात IREDA कंपनीचं महत्व वाढलं आहे.
जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत
तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, ‘जागतिक स्तरावर नवीकरणीय ऊर्जा संदर्भात खूप सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यामुळे या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी इरेडा शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 180 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. मध्यम कालावधीसाठी ते दीर्घकालीन दृष्टिकोनानुसार हा शेअर फायद्याचा ठरणार आहे असं तज्ज्ञ म्हणाले.
इरेडा शेअर टार्गेट प्राईस
इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांनी 240 रुपये ही पहिली टार्गेट प्राईस दिला आहे. 1 वर्षाच्या आत इरेडा शेअर 300 रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तसेच १ ते दीड वर्षाहून अधिक कालावधीचा विचार केल्यास हा शेअर 425 रुपयांपर्यंतही वाढू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		