NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा – NSE: NBCC

NBCC Share Price | एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ४०५ कोटी रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. या अपडेटनंतर एनबीसीसी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. बुधवारी हा शेअर 2.76 टक्क्यांच्या तेजीसह 86.43 रुपयांवर ट्रेड करत होता. एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ५ कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले असून त्याची एकूण किंमत ४०५.०८ कोटी रुपये आहे. एनबीसीसी कंपनीला मिळालेल्या या नवीन कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीची कंसॉलिडेटेड ऑर्डरबुक 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

एनबीसीसी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 15 जानेवारी 2025 रोजी एनबीसीसी कंपनी शेअर 2.76 टक्क्यांनी वाढून 86.43 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 139.83 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 56.40 रुपये होती. एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 23,350 कोटी रुपयांवर आहे.

एनबीसीसी कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्ट तपशील

एनबीसीसी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये अपडेट देताना म्हटले आहे की, ‘एनबीसीसी कंपनीने गव्हर्नमेंट हाऊसिंग कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारानुसार एनबीसीसी लिमिटेड कंपनीला लखनौच्या ईस्ट विहार मधील ५८८ एकर क्षेत्रातील विकास कामांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी संबंधित आहे. या

एनबीसीसी कंपनी ऑर्डरबुक तपशील

एनबीसीसी लिमिटेड कंपनीचा ९२% महसूल पुनर्विकास प्रकल्पांमधून मिळतो. या अंतर्गत एनबीसीसी लिमिटेड कंपनी संस्थात्मक व गृहनिर्माण प्रकल्प, रस्ते व महामार्ग, रुग्णालये, महाविद्यालये, शाळा, शासकीय वसाहती आणि मालमत्ता पुनर्विकासाचे काम करते. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत एनबीसीसी लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक 84,400 कोटी रुपये होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Wednesday 15 January 2025 Marathi News.