
Jio Finance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी आलेल्या अपडेटनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी स्थानिक चलन डेट मार्केटमध्ये पदार्पण करण्यासाठी अनेक कर्जदारांशी वाटाघाटी करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कडक नियमांमुळे एनबीएफसी कंपन्यांना बाजारातून पैसा उभा करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी कधीपर्यंत निधी उभारणार
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी जानेवारी-मार्च तिमाहीच्या सुरुवातीला डेट मार्केटमध्ये उतरण्याची अपडेट समोर आली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी कर्ज किंवा बाँड ऑफरिंगच्या माध्यमातून निधी उभारू शकते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी हा निधी कर्ज फेडण्यासाठी वापरले, अशी माहिती मीडिया सूत्रांनी दिली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीकडून कर्जाचा आकार आणि अटी अद्याप निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आहेत.
कर्ज उभारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने लागू केले कडक नियम
दरम्यान, शॅडो लेंडर्सना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कडक नियमांमुळे बँकांकडून कर्ज उभारणे अवघड झालेलं असताना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या कडक नियमांमुळे गेल्या वर्षभरात भारतीय शॅडो लेंडर्स वेगाने ऑफशोर कर्ज घेत आहेत. दरम्यान, ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने अद्याप या प्रकरणी ई-मेलवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 1.56 टक्क्यांनी वाढून 276.65 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 237.10 रुपये होती. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,75,764 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने किती परतावा दिला
जिओ फायनान्स कंपनी शेअर मागील १ महिन्यात 18.73 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत जिओ फायनान्स शेअर 19.65 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र गेल्या एक वर्षात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 11.15 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.