
Reliance Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स 224.45 अंकांनी वाढून 76,724.08 वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 37.15 अंकांनी वाढून 23,213.20 वर स्थिरावला होता. आता येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक तेजीचे संकेत दिले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड शेअर 1.82 टक्क्यांनी वाढून 1,275 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 1,608.80 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 1,201.50 रुपये होती. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 17,25,242 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये – टार्गेट प्राईस
येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील १,६०८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर २५ टक्क्यांनी घसरला असला तरी अलीकडच्या ट्रेडिंग ऍक्टिव्हिटीमुळे ट्रेंडमध्ये संभाव्य बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने अलीकडेच वाढीव कालावधीनंतर २०-दिवसांच्या SMA च्या वर झेप घेतली आहे, ज्यामुळे तेजीचे संकेत मिळत आहेत. दैनंदिन चार्टवर रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 1,270 रुपयांच्या रेझिस्टन्स लेव्हलच्या वर यशस्वी ब्रेकआऊट झाल्यास 1370 – 1400 रुपयांच्या प्राईस झोनकडे तेजी येऊ शकते. मात्र गुंतवणूकदारांनी 1,200 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 2.27% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 0.53% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 19.11% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 7.25% घसरला आहे. मागील ५ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 62.82% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 4,709.51% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 4.40% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.