19 May 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

IRFC Share Price | IRFC सह इतर रेल्वे शेअर्समध्ये अस्थिरता, नेमकं कारण काय? IRFC आणि RVNL शेअर्स पुढे फायदा देतील?

IRFC Share Price

IRFC Share Price | रेल्वेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये दोन दिवस मजबूत घसरण झाली होती. मात्र आज हे शेअर्स पुन्हा सावरले आहेत. चालू आठवड्यात सुरुवातीचे काही दिवस रेल्वे संबंधित कंपनीच्या शेअर्ससाठी मंदीचे होते. प्रॉफिट बुकींगमुळे हे शेअर्स घसरले होते. चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRCON इंटरनॅशनल, IRFC आणि RVNL यासारख्या रेल्वे कंपनीच्या शेअर्सनी मजबूत तेजी नोंदवली होती.

मात्र त्यानंतर स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली आणि मंगळवारी या कंपन्याचे शेअर्स 4 ते 8 टक्के कमजोर झाले होते. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी IRFC कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के वाढीसह 79.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. यासह RVNL कंपनीचे शेअर्स देखील 1.74 टक्के वाढीसह 169.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून रेल्वे संबंधित कंपन्याच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली. आणि गुंतवणुकीच्या देखील भरपूर संधी दिल्या. मंगळवारी IRFC शेअर्स 2.18 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आणि नुकताच भारतीय रेल्वे वित्त निगम म्हणजेच IRFC कंपनीचे बाजार भांडवल 1 लाख कोटी रुपयांच्या पार गेले होते. मागील पाच दिवसांत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.36 टक्के परतावा कमावून दिला होता आणि अवघ्या एका महिन्यात या शेअरची किंमत 63.03 टक्के वाढली होती.

मंगळवारी तर RVNL कंपनीच्या शेअरमध्ये 10.08 टक्के घसरण पहायला मिळाली होती. आणि मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 13.60 टक्के परतावा कमावून दिला होता. मागील एका महिन्यात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 35.97 टक्के नफा कमावून दिला आहे.

शेअर बाजारातील अस्थिरता आणि रेल्वे शेअरमधील चढ उतार पाहून तज्ञांनी या शेअर्सबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र तज्ञांच्या मते पडत्या किमतीवर हे शेअर्स खरेदी केल्यास, अप ट्रेण्डमध्ये फायदा होऊ शकतो. एमके ग्लोबल फर्मच्या तज्ञांनी रेल्वेशी संबंधित काही शेअर्समध्ये कंसोलिडेशन आणि करेक्शन पाहायला मिळत आहे, असे मत मांडले आहे.

म्हणून तज्ञांनी गुंतवणूकदारांना पैसे गुंतवताना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील इतर तज्ञांच्या मते रेल्वे स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फारसे फायदेशीर वाटत नाही. म्हणून तज्ञांनी हे शेअर्स खरेदी करण्याबाबत अनुत्सुकता दर्शवली आहे. तज्ज्ञांच्या मते लार्ज कॅप्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे थोडे जोखमीचे वाटत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IRFC Share Price today on 14 September 2023

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x