
Yes Bank Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट जबरदस्त तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केटचे दोन्ही निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सकारात्मक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारातील सलग ३ दिवसांमधील तेजीने अनेक शेअर्स तेजीने वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. या तेजीत येस बँक शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. ब्रोकरेज फर्म सुद्धा येस बँक शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळत आहे.
येस बँक लिमिटेड शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड शेअर 1.84 टक्क्यांनी वाढून 18.30 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 32.85 रुपये होता, तर येस बँक लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 17.06 रुपये होता. येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 57,309 कोटी रुपये आहे.
येस बँक लिमिटेडबाबत महत्वाची अपडेट
25 जानेवारी 2025 रोजी येस बँक लिमिटेड चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी येस बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत बँकेच्या संचालक मंडळाकडून महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. बँकेने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली आहे.
वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेजकडून ‘BUY’ रेटिंग
वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मच्या शेअर बाजार तज्ज्ञ क्रांती बथिनी यांनी येस बँक स्टॉकबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. क्रांती बथिनी यांच्या मते येस बँक लिमिटेडचे बिझनेस फंडामेंटल कोणतेही सकारात्मक संकेत देताना दिसत नाही, असं त्या म्हणाल्या.
ज्या गुंतवणूकदारांकडे अधिक रिस्क घेण्याची क्षमता आहे ते येस बँक शेअर ‘HOLD’ करू शकतात. टेक्निकल चार्टवर येस बँक स्टॉकला 18.8 रुपये आणि 18 रुपयांच्या पातळीवर सपोर्ट दिसत आहे. मात्र काही शेअर बाजार विश्लेषकांनी नजीकच्या काळातील येस बँक शेअर २२ रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो असे देखील संकेत दिले आहेत.
येस बँक लिमिटेड शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात येस बँक लिमिटेड शेअरने 1.10% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात येस बँक लिमिटेड शेअर 13.88% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 30.13% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 28.65% घसरला आहे. मागील ५ वर्षात येस बँक लिमिटेड शेअर 53.38% घसरला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 47.94% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर येस बँक लिमिटेड शेअर 6.78% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.