
Suzlon Share Price | शनिवार, 18 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 0.21 टक्क्यांनी वाढून 56.99 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 76,945 कोटी रुपये आहे.
वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म
वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे इक्विटी स्ट्रॅटेजी तज्ज्ञ क्रांती बथिनी म्हणाल्या की, ‘उच्च जोखीम घेण्याची क्षमता असलेले गुंतवणूकदार सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर्स खरेदी करू शकतात. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात तेजी असल्याने सुझलॉन एनर्जी शेअर घसरल्यास गुंतवणूकदार अधिक शेअर्सची खरेदी करू शकतात, असं विश्लेषकांनी म्हटलं आहे.
सुझलॉन एनर्जी शेअर सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल
टेक्निकल सेटअपवर सुझलॉन एनर्जी शेअरला ५८ ते ५४ रुपयांच्या रेंजमध्ये सपोर्ट मिळू शकतो. तसेच सुझलॉन एनर्जी शेअरमधील सकारात्मक ट्रेंड रिव्हर्सलसाठी ६५-७० रुपयांच्या झोनच्या पुढे वाढ आवश्यक आहे. मात्र एका विश्लेषकाने सुझलॉन शेअर सध्याच्या पातळीवर खरेदी न करण्याचा सल्ला देखील दिला.
एंजल वन ब्रोकिंग फर्म
एंजल वन ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ ओशो कृष्ण म्हणाले की, “सुझलॉन एनर्जी शेअरने 66-70 रुपयांच्या सबझोनजवळ कंसोलिडेशनच्या टप्प्यानंतर घसरण सुरू केली. शेअरला नुकत्याच झालेल्या ५६ ते ५४ रुपयांच्या नीचांकी पातळीमुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि त्यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. कारण शेअरमध्ये आणखी घसरण झाल्यास शॉर्ट टर्म दृष्टीकोन बिघडू शकतो. सुझलॉन शेअरला वरच्या बाजूला ६५-७० रुपयांचा वरील झोन भक्कम अडथळा ठरण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
आनंद राठी ब्रोकिंग फर्म
आनंद राठी ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ जिगर एस पटेल म्हणाले की, ‘सुझलॉन एनर्जी शेअरला सपोर्ट 58 रुपये आणि रेझिस्टन्स 62 रुपये असेल. सुझलॉन एनर्जी शेअरने ६२ रुपयांच्या वर तेजी दाखवल्यास पुढे ६५ रुपयांच्या वर आणखी तेजी येऊ शकते. सुझलॉन एनर्जी शेअरची अपेक्षित शॉर्ट टर्म ट्रेडिंग रेंज ५७ ते ६५ रुपयांच्या दरम्यान असेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.