
RVNL Share Price | सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी आरव्हीएनएल कंपनी शेअर 2.22 टक्क्यांनी घसरून 401 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 647 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 213.05 रुपये होता. सोमवारच्या घसरणीनंतर आरव्हीएनएल कंपनीचे एकूण मार्केट कॅप 83,588 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
आरव्हीएनएल शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले संकेत
युनिवेस्ट ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ प्रणित अरोरा रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीबाबत मत मांडताना म्हणाले की, ‘आपण आरव्हीएनएल शेअर्समध्ये कंसोलिडेशनचा टप्पा पाहिला आहे. मागील दिवसांपासून आरव्हीएनएल शेअरमध्ये केवळ १ ते २ टक्क्यांचे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. प्रणित अरोरा पुढे म्हणाले की, ‘आगामी अर्थसंकल्पातील रेल्वे संबंधित घोषणा आरव्हीएनएल शेअरची दिशा निश्चित करतील.
केंद्रीय अर्थसंकल्प जवळ येतोय त्यामुळे आरव्हीएनएल शेअरमध्ये हालचाली होताना दिसून येत आहेत. मात्र सध्या आरव्हीएनएल शेअर मजबूत होत आहे. त्यामुळे इथून पुढे तेजी येण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रणित अरोरा यांनी व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांच्या मते आरव्हीएनएल कंपनीचे फंडामेंटल सकारात्मक आहेत. तसेच कंपनीचा आरओसी आणि शेअरहोल्डिंग पॅटर्न खूप चांगला दिसतो. मात्र, गेल्या काही तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या महसुली वाढ चांगली झालेली नाही. आता गुंतवणूकदार 2024-25 च्या डिसेंबर तिमाही निकालाची वाट पाहत आहेत. आरव्हीएनएल कंपनीच्या महसुलात थोडी चांगली वाढ झाली आणि आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा झाल्या, तर शेअरमध्ये मोठी आणि सकारात्मक तेजी अपेक्षित आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 34.09 टक्के परतावा दिला आहे. मागील पाच वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1,520.20 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये आरव्हीएनएल शेअरने 1,930.38 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.