9 May 2025 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | पडझडीतही गुंतवणूकदारांकडून मोठी खरेदी, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरसाठी BUY रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | हा मल्टिबॅगर शेअर ठरू शकतो फायद्याचा, पुढे टार्गेट प्राईस अपेक्षित जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | मंदीत संधी, स्वस्तात मिळतोय या कंपनीचा शेअर, संयम ठेवल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: SUZLON 7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली
x

Gratuity Money Alert | खाजगी पगारदारांसाठी 25 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी वाढली, तुमच्या खात्यात किती रक्कम जमा होईल इथे पहा

Gratuity Money Alert

Gratuity Money Alert | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ग्रचूईटी रक्कम दिली जाते. ग्रॅच्युइटी रक्कम कर्मचाऱ्याला त्याने दिलेल्या सेवेमुळे मिळते. कर्मचाऱ्यांना मिळणारी ही एक प्रकारची आर्थिक मदत असते. त्याचबरोबर कोणत्याही कर्मचाऱ्याला मिळणारी ग्रॅच्युईटी रक्कम ही त्याच्या शेवटच्या पगारावर अवलंबून असते. दरम्यान आज आम्ही तुम्हाला 5 वर्षांची ड्युटी केल्यानंतर किती ग्रॅच्युएटी रक्कम मिळणार हे सांगणार आहोत.

तसं पाहायला गेलं तर कुणाला किती ग्रॅच्युएटी रक्कम मिळणार हे ज्याच्या त्याच्या पगारावर अवलंबून असतं. सरकारने 2024 मध्ये 1 जानेवारी या तारखेपासून 20 लाखांच्या ग्रॅच्युइटी रक्कमेची वाढ करून 25 लाख रुपये केली आहे. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता DA 50% टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दरम्यान ही सुधारणा 30 मे 2024 रोजी सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे. ही सुधारणा पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने केली आहे.

ग्रॅच्युईटी पेमेंट कायद्याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या :
तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ग्रॅच्युईटी पेमेंट कायद्याविषयी फारशी माहिती नसेल. या कायद्याअंतर्गत खाणी, तेल, वृक्षारोपण क्षेत्रे, बंदरे, रेल्वे, मोटार वाहतूक उपक्रम, कारखाने यांसोबत इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांसह इतर दुकानांमध्ये देखील लागू आहे.

या कायद्याअंतर्गत बसणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना 15 दिवसांच्या पगाराएवढी ग्रॅच्युईटी रक्कम मिळवण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. ग्रॅच्युईटी रक्कम मिळवण्याची मर्यादा 25 लाख रुपये जरी असली तरी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा केवळ 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी कोण कोणत्या अटी पाळाव्या लागतात :
1. कर्मचाऱ्याला ग्रॅच्युईटी रक्कम मिळवण्यासाठी एखाद्या कंपनीमध्ये कामाचे योगदान पूर्णपणे द्यावेच लागते. किमान 5 वर्षे एकाच कंपनीमध्ये टिकून राहावे लागते. तर रस्त्या व्यक्तीला ग्रॅच्युईटी रक्कम देण्यात येते.

2. ग्रॅच्युईटी मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे 5 वर्ष सेवेचे पूर्ण झाल्यानंतर देखील तो राजीनामा देऊन ग्रॅच्युइटी रक्कम मिळवू शकतो. त्याचबरोबर एखादा कर्मचारी अपंगग्रस्त किंवा गंभीर आजाराने त्रस्त झाला, त्याचबरोबर त्याचा अचानक एक्सीडेंट होऊन तो मृत्युमुखी पावला तर, त्याची संपूर्ण ग्रॅच्युईटी रक्कम वारसाला दिली जाते.

3. ग्रॅच्युईटी रक्कम मोजण्यासाठी एक जबरदस्त सूत्र तयार करण्यात आले आहे. हे सूत्र (शेवटचा पगार x कामाच्या योगदानाचे वर्ष x 15/26). या सूत्राप्रमाणे ग्रॅच्युइटी रक्कम ठरवण्यात येते.

4. ग्रॅच्युईटी रक्कम मोजताना कर्मचाऱ्याच्या शेवटच्या पगाराचे मूळ वेतन, कमिशन आणि महागाई भत्ता या सर्व गोष्टींचा समावेश केला जातो. दरम्यान एका महिन्याचे 26 दिवस कामकाजाचे मोजले जातात आणि 15 दिवसांच्या सरासरी रक्कमेची ग्रॅच्युइटी गणना केली जाते.

Latest Marathi News | Gratuity Money Alert Thursday 13 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gratuity Money Alert(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या