2 May 2025 5:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH
x

Safe Investment Scheme | ट्रीपल बेनिफिट आणि मजबूत परतावा मिळणार, व्याजातून होईल 20,500 रुपयांची कमाई

Safe Investment Scheme

Safe Investment Scheme | प्रत्येक व्यक्ती निवृत्तीनंतर आपलं आयुष्य आनंदात आणि सुखात जावं यासाठी गॅरेंटेड रिटर्न मिळवून देणारी योजना शोधत असतो. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची सीनियर सिटीजन सेविंग स्किम ही योजना फायदेशीर ठरू शकते. या योजनेतून तुम्ही पैशांची बचत करून 20,500 रुपयांची मासिक कमाई करू शकता.

मिळणार एकूण 3 प्रकारचे फायदे :
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम पोस्टाची ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. यामध्ये ज्येष्ठांना एकूण 3 प्रकारचे फायदे अनुभवायला मिळतील. त्यामधील पहिला फायदा म्हणजे सुरक्षित गुंतवणूक, दुसरा फायदा म्हणजे मिळणारे घसघशीत व्याज आणि तिसरा फायदा म्हणजे योजनेमध्ये दिले जाणारे टॅक्स बेनिफिट.

मिळतो जास्तीत जास्त इंटरेस्ट :
पोस्टाची ज्येष्ठांसाठी लोकप्रिय ठरलेली सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही एक प्रकारची डिपॉझिट योजना आहे. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा केली जात असून, कमीत कमी गुंतवणुकीची लिमिट 1000 तर, जास्तीत जास्त 30,00,000 रुपये आहे. सध्याच्या घडीला ही योजना आपल्या ग्राहकांना 8.2% दराने व्याजदर देत आहे.

अशी मिळेल 20,500 रुपयांची पेन्शन :
समजा एखाद्या व्यक्तीने वर सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त 30,00,000 रुपयांची रक्कम योजनेत गुंतवली तर, 8.2% व्याजदराने पाच वर्षांत 12,30,000 रुपयांचे निव्वळ व्याज मिळेल. अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याला व्याज म्हणून 61,500 रुपये क्रेडिट होतील. याच पैशांचे 3 भागांमध्ये विभाजन केले असता 20,500 रुपये होतील. म्हणजेच तुम्हाला महिन्याला पेन्शन स्वरूपी 20,500 रुपये मिळतील.

गुंतवणुकीस कोण पात्र :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 60 वर्षीय नागरिक किंवा 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात. 5 वर्षांच्या योजनेपेक्षा तुम्हाला आणखीन गुंतवणूक सुरू ठेवायची असेल, संपण्याच्या 1 वर्षआधी तुम्हाला काही नियम आणि अटींचे पालन करून योजना वाढवून घ्यायची आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Safe Investment Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या