12 December 2024 8:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कांग्रेस है तो ही मुमकिन है? | राजस्थानमध्ये मोदी सरकार देत असलेला उज्ज्वला योजनेतील 1040 रुपयांचा सिलिंडर 500 रुपयात

CM Ashok Gehlot

LPG Cylinder in Rs 500 | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील गरीब कुटुंबांना केवळ ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि ज्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे, अशा कुटुंबांसाठी गेहलोत यांनी ही घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2023 पासून आपली नवी योजना लागू करण्यात येणार असून त्यासाठी पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राजस्थानमधील अलवरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही मोठी घोषणा केली.

राहुल गांधी, खरगे यांच्या उपस्थितीत घोषणा
अलवरच्या मलाखोदा येथे आयोजित सभेत अशोक गेहलोत यांनी आपल्या नव्या योजनेची घोषणा केली तेव्हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या नव्या योजनेविषयी माहिती देताना गेहलोत म्हणाले की, पुढील महिन्यात त्यांचे सरकार राज्याचा नवा अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात दारिद्यरेषेखालील कुटुंबांना स्वस्त स्वयंपाकाचा गॅस देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून राज्यातील उज्ज्वला योजनेशी संबंधित गरिबांना १ हजार ४० रुपयांचे एलपीजी सिलिंडर अवघ्या ५०० रुपयांत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत अशा कुटुंबांना वर्षभरात १२ सिलिंडर स्वस्त दरात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात सादर होणाऱ्या नव्या अर्थसंकल्पात जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्यासाठी किट वाटपाची योजनाही आणली जाईल, असेही गेहलोत यांनी सांगितले. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राही शंभर दिवस पूर्ण करून राजस्थानमधून जात आहे.

मोदी सरकारने गॅस कनेक्शन दिले, पण सिलिंडर रिकामे पडले आहेत : गेहलोत
अशोक गेहलोत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना एलपीजी कनेक्शन दिले, पण त्यांच्या घरातील सिलिंडर रिकामे आहेत, कारण गॅस सिलेंडरची किंमत 400 रुपयांवरून 1040 रुपये झाली आहे. सामान्य जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकार एकापाठोपाठ एक अनेक पावले उचलणार आहे, असे ते म्हणाले. गेहलोत म्हणाले की, त्यांचे सरकार केवळ 50 युनिटपर्यंत मोफत वीज देत नाही, तर शेतकऱ्यांना दरमहा 1,000 रुपये दिले जात आहेत. यामुळे राज्यातील 46 लाख शेतकऱ्यांना वीज खर्च करण्यासाठी खिशातून पैसेही खर्च करावे लागत नाहीत.

राजस्थान सरकार १ कोटी लोकांना पेन्शन देणार – गेहलोत
मुख्यमंत्री गहलोत म्हणाले की, त्यांचे सरकार सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांतर्गत राज्यातील एक कोटी लोकांना पेन्शन देत आहे. कोरोना महामारीच्या काळात राजस्थान सरकारने खूप चांगले काम केले, त्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडूनही (डब्ल्यूएचओ) कौतुक करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. याशिवाय गहलोत यांनी आपल्या सरकारकडून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचाही या रॅलीत उल्लेख केला.

राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून, राज्यात पुन्हा सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र, गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या गटांमध्ये प्रदेश काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हे प्रयत्न यशस्वी होण्याच्या शक्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान हे दोन्ही नेते सतत एकत्र दिसतात. अलवरच्या रॅलीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत हे दोघंही एका मंचावर उपस्थित होते. पण केवळ कार्यक्रमात एकत्र राहण्याच्या आधारावर त्यांच्या परस्परांतील विसंवादात काही घट झाली आहे, असे म्हणता येणार नाही. विशेषत: गेहलोत यांनी अलीकडेच सचिन पायलट यांच्याबाबत ज्या प्रकारची वक्तव्ये केली, ती पाहता तसे करणे सोपे नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LPG gas cylinder in 500 rupees in Rajasthan state declared by CM Ashok Gehlot for poor families check details on 20 December 2022.

हॅशटॅग्स

#CM Ashok Gehlot(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x