SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार

SBI Home Loan EMI | एसबीआयने गृहकर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्सची कपात केली असून नवीन व्याजदर 8.25 टक्क्यांवर आला आहे. हे नवे दर 15 फेब्रुवारी 2025 पासून लागू झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर बँकेने हा निर्णय घेतला आहे.

रिझर्व्ह बँकेने मागील पतधोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत रेपो दर 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांवर आणला होता. एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क-बेस्ड लेंडिंग रेट (ईबीएलआर) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) देखील कमी केले आहेत.

ईएमआयमध्ये किती फरक पडणार?

जर तुम्ही 20 वर्षांसाठी 5 कोटी रुपयांचे होम लोन घेत असाल तर ईएमआयमध्ये होणार बदल:

जुना व्याजदर (8.50%)

* ईएमआय: 43,391 रुपये
* एकूण व्याज देयक : 54,13,879 रुपये
* एकूण देयक : 1,04,13,879 रुपये

नवा व्याजदर (8.25 टक्के)

* ईएमआय: 42,603 रुपये
* एकूण व्याज देयक : 52,24,788 रुपये
* एकूण देयक : 10,224,788 रुपये

म्हणजेच दरमहा ईएमआयमध्ये सुमारे 788 रुपयांची बचत होते आणि एकूण कालावधीत लाखो रुपयांची बचत होते.

EMI मध्ये किती बचत होईल?
* दरमहा 785 रुपयांची बचत
* संपूर्ण कालावधीत एकूण 1,88,460 रुपयांची बचत

व्याजदरात कपात केल्यास गृहकर्ज ग्राहकांना दीर्घ काळासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.