1 May 2024 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

संवेदनशील नाना पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार

Nana patekar, Naam Foundation, SangliFlood, KolhapurFlood

कोल्हापूर : सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.

दरम्यान, पद्माराजे विद्यालयात नाना पाटेकर यांनी काही पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करु नका आपण सगळे सोबत आहोत सगळं काही नीट होणार असं आश्वासन नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलं. शिरोळमध्ये आलो आहे इथे आता ५०० घरं उभारणार आहोत. नाम, नाना पाटेकर, मकरंद असं आम्हाला श्रेय लाटायचं नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, आत्ताही अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे.

मी मदत करणार म्हणजे काय? तर मीदेखील झोळी घेऊन लोकांकडेच पैसे मागणार लोक देतात त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. जिथे जिथे कमतरता भासेल तिथे आम्ही उभे राहतोच आहोत असेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे. मनाने संवेदनशील असणारे नाना पाटेकर आज सांगलीतील ५ गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे. हे मदतकार्य करत असताना पद्माराजे विद्यालयात नाना पाटेकर यांनी काही पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करु नका आपण सगळे सोबत आहोत सगळं काही नीट होणार, असे आश्वासन देत अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

हॅशटॅग्स

#Nana Patekar(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x