20 May 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

७० वर्षांत अर्थव्यवस्था सर्वात वाईट स्थितीत; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची कबुली

Niti Ayog, PM Narendra Modi, Vice Chairman Rajiv Kumar, Indian Economy

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था धोक्यात आल्याची कबुली नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली आहे. गेल्या ७० वर्षात सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती सर्वात वाईट झाली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाल्याचं आता नीती आयोगाने मान्य केल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला चागंलाच धक्का बसला आहे.

‘खाजगी कंपन्यांना विश्वासात घ्यायला हवं. पूर्ण वित्तीय प्रणालीसाठी सध्याचा काळ जोखमीचा आहे. याआधी ३५ टक्के रोकड उपलब्ध होती. पण आता तीही उपलब्ध नाही. या सर्व कारणांमुळे अर्थव्यवस्था अत्यंत ढासळली आहे,’ अशी कबुली नीती आयोगाच्या राजीव कुमार यांनी दिली आहे. देशात आर्थिक मंदी येणार असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. भारताची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक कोटी १० लाख लोकांचा रोजगार गेला, अशी आकडेवारी आहे.

नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्था बदलून गेली आहे. पूर्वी सुमारे ३५ टक्के रोखी उपलब्ध होती, आता मात्र यात बरीच घट झालेली दिसत आहे. यामुळे स्थिती अत्यंत अवघड बनली आहे, अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिलीय. त्यात भर म्हणजे सन २००९ पासून ते २०१४ पर्यंत कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्जवाटप करण्यात आले.

यामुळे सन २०१४ नंतर एनपीएमध्ये ( नॉन परफॉर्मिंग असेट्स) वाढ झाली. या कारणामुळे बँकांची नवे कर्ज देण्याची क्षमता कमी झाली, असेही राजीव कुमार म्हणाले. बँकांनी कमी कर्ज देण्याची भरपाई एनबीएफसीने केली आहे. एनबीएफसीच्या कर्जात २५ टक्के वाढ झालीय. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नुकत्याच सादर करण्यात आलेला अर्थसंकल्पात काही तरतुदी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x