2 May 2024 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
x

मुख्यमंत्री कमलनाथ यांना धक्का, शीखविरोधी दंगलीची फाइल केंद्रीय गृह मंत्रालय उघडणार

Madhya Pradesh Government, Madhya Pradesh CM kamalnath, 1984 anti sikh riot case

नवी दिल्ली: माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक बडे नेते आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ अडचणीत येण्याची शक्यता आहे. १९८४मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगलीची फाइल पुन्हा उघडण्याची तयारी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केली आहे. ही केस पुन्हा उघड झाल्यास कमलनाथ यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात अनेक ठिकाणी शीख विरोधी दंगल उसळली होती. इंदिरा गांधी यांची हत्या करणारे दोघे आरोपी हे शीख समाजातले असल्यामुळे शीखविरोधी वातावरण तापले होते. शिरोमणी अकाली दलाचे दिल्लीतील आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. दरम्यान, याआधी २०१८ मध्ये एमपी विधानसभा निवडणुकीनंतर कमलनाथ मुख्यमंत्री झाले. त्यावेळी १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात कमलनाथ यांचे नाव पुढे आले होते. तेव्हा भाजपाने त्यांना मुख्यमंत्री न करण्याची मागणी केली होती.

केंद्रीय गृहमंत्रालयाने कमलनाथ यांच्याविरोधात १९८४च्या शीख विरोधी दंगलीची फाइल पुन्हा उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिरोमणी अकाली दलाचे दिल्लीचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी आज ही माहिती दिली. मनजिंदर सिंह सिरसा ट्विटरवरुन म्हटले आहे की, “अकाली दलासाठी एक मोठा विजय. १९८४ मध्ये शिखांचा नरसंहार झाला. यात कमलनाथ यांचा कथित समावेश असल्याच्या प्रकरणाला एसआयटीने पुन्हा उघडले. गेल्या वर्षांपासून गृह मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालयाने कमलनाथ यांच्याविरोधात ताज्या पुराव्यांवर विचार करुन प्रकरण नंबर ६०१/८४ पुन्हा उघडण्याचे पत्रक जारी केले आहे.”

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x