13 December 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा
x

Lok Sabha Election 2024 | विरोधी पक्षांची पुढील बैठक 13-14 जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार, भाजपचा मार्ग अवघड होणार

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 | पुढील वर्षी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याचा प्रयत्न करणारे विरोधक पुढील बैठक काँग्रेसशासित कर्नाटकात घेणार आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांची पुढील बैठक १३ आणि १४ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी दिली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २३ जून रोजी बोलावलेल्या बैठकीत सुमारे १४ भाजपविरोधी पक्ष सहभागी झाले होते. 23 जूनच्या बैठकीचा संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, “पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी अस्वस्थ झाले आहेत. शरद पवार 2019 मध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये सामील होतील, या फडणवीस यांच्या दाव्यावर ते म्हणाले, “हे संपूर्ण प्रकरण त्यांना (राज्यातील भाजप नेत्यांना) सत्तेसाठी किती आतुर आहे हे उघड करण्यासाठी होते. हा राजकीय खेळ होता की नाही, असे विचारले असता पवार म्हणाले की, हा राजकीय खेळ होता की नाही हे मला माहित नाही, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझे सासरे सादू शिंदे हे खूप चांगले गुगली गोलंदाज होते आणि मी आयसीसीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली बॉल कसा फेकायचा हे मला माहित आहे.

विरोधकांनी भाजपविरोधात संयुक्त रणनीती आखली

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष संयुक्त रणनीतीवर चर्चा करत आहेत. केंद्रात भाजपला पराभूत करण्यासाठी २०२४ ची लोकसभा निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्धार १४ विरोधी पक्षांनी शुक्रवारी पाटणा येथे झालेल्या बैठकीत केला होता. या बैठकीनंतर पुढील महिन्यात (जुलैमध्ये) शिमला येथे बैठक घेऊन संयुक्त रणनीती आखणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता ही बैठक बेंगळुरूत होणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

कोण असेल एकत्र?

गेल्या बैठकीत विरोधी पक्षांपैकी केवळ आपची भूमिका हट्टी आणि संशयास्पद असल्याचे दिसले होते. दरम्यान, काँग्रेस सूडाच्या राजकारणाला घाबरत नाही, असे राहुल गांधी यांनी सोमवारी पक्षाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांच्या भेटीवेळी स्पष्ट सांगितले होते.

विरोधी पक्ष आता किती मजबूत?

गेल्या बैठकीत १४ पक्षसहभागी झाले होते. ५४३ सदस्यांच्या लोकसभेत या पक्षांचे एकत्रित संख्याबळ २०० पेक्षा कमी आहे. पण पुढील लोकसभा निवडणुकीत ते एकत्रितपणे भाजपला १०० पेक्षा कमी जागांवर आणतील, अशी त्यांच्या नेत्यांचा अंदाज आहे. सध्या लोकसभेत भाजपचे संख्याबळ ३०० च्या वर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसने ५० पेक्षा थोड्या जास्त जागा जिंकल्या होत्या. मात्र हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील यश आणि राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळालेला भरघोस प्रतिसाद यामुळे उत्साहित झालेल्या काँग्रेसला २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत दमदार पुनरागमनाची आशा आहे आणि सर्व सर्व्ह देखील तसे संकेत देतं आहेत.

News Title : Lok Sabha Election 2024 oppositions meeting check details on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election 2024(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x