28 April 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

संशोधनाचे अजब दाखले! आइन्स्टाइनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला: पियुष गोयल

Minister Piyush Goyal, Maths, Einstein, Gravity

नवी दिल्ली: ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ओला, उबरला जबाबदार धरल्यानं दोनच दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. यानंतर आता रेल्वे मंत्री पीयूष गोयल नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावताना आईनस्टाईनला गणिताची मदत झाली नव्हती, असं अजब विधान गोयल यांनी केलं. यानंतर सोशल मीडियानं गोयल यांची चांगलीच खिल्ली उडवली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऑटो सेक्टरमधील मंदीला ओला-उबरला जबाबदार धरले होते. त्यावर सर्वच स्तरातून भाजपवर टीका करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर बोर्ड ऑफ ट्रेड मीटिंगमध्ये बोलताना गोयल यांनी हे विधान केलं. अर्थव्यवस्थेचा विचार करताना मोठमोठ्या आकड्यांमध्ये पडण्याची गरज नसते. आइन्स्टाइन यांनी आकडे आणि गणिताची चिंता केली असती तर त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध कधीच लावला नसता, असं गोयल यांनी सांगितलं होतं.

गोयल यांच्या या वक्तव्यावर सीपीआयएमचे नेते सीताराम येचुरी यांनीही जोरदार टीका केली आहे. ‘अर्थव्यवस्थेच्या गणिताची जाणीव होण्यासाठी सरकारने डोक्यावर सफरचंद पडण्याची वाट पाहू नये. हे सांगण्यासाठी आम्हाला आइन्स्टाइनचीही (न्यूटनची माफी मागून) गरज नाही. भविष्यातील स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा मंत्र्यांनी वास्तवावर लक्ष केंद्रीत केलं तर बरं होईल,’ असा टोला येचुरी यांनी लगावला आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x