28 April 2024 10:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस?
x

व्यंगचित्र: भाजपकडून पुन्हा राज यांना डिवचण्याचा प्रयत्न; प्रचाराआधी मनसेचीच धास्ती?

Raj Thackeray, MNS, Maharashtra Navnirman Sena, BJP Maharashtra

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाची प्रचारात चांगलीच दमछाक केल्याचं पाहायला मिळालं. प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी असणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार त्यावरून भाजपात आधीच धाकधूक वाढल्याचं हे लक्षण म्हणावं लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाची व्यंगचित्रकार टीमचं बनवून रोज राज ठाकरे यांना लक्ष करण्याचा सपाटा लावला होता.

मनसे विधानसभेत नेमक्या किती जागा लढविणार ते अजून निश्चित झालेलं नसताना भाजपा मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेकडे नजर लावून बसली आहे असंच म्हणावं लागेल. आजच विधानसभा निवडणुकांची तारीख आणि निकालाची तारीख आजच जाहीर करण्यात आली. परंतु देशातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपने पहिला हल्ला राज ठाकरे यांच्यावर केल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यासाठी भाजपने पुन्हा व्यंगचित्रांचा आसरा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख या व्यंगचित्रात चक्क ‘सोंगटी’ असा करण्यात आला आहे. ‘राज’मान्य खेळ असा मथळा या व्यंगचित्रात देण्यात आला आहे.

काय आहे नेमकं व्यंगचित्रात?

राज ठाकरेंबाबतच्या या व्यंगचित्रात राज ठाकरे ठिक्कर या खेळाच्या मधोमध उभे आहे असे दाखवण्यात आले आहे. २००४ च्या चौकटीत शिवसेना, २००९ च्या चौकटीत मनसे दाखवण्यात आली आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दोन चौकटी दाखवण्यात आल्या. त्यामध्ये राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या चौकटीत उभे राहिले आहेत असे दाखवण्यात आले आहे. त्यापुढे २०१९ ची विधानसभा निवडणुकीची चौकट आहे, त्यामध्ये जाणीवपूर्वक प्रश्नचिन्ह दाखवण्यात आले असून राज ठाकरेंना सोंगटी असे संबोधण्यात आले आहे. ‘आता ही सोंगटी कोणत्या चौकटीत पडणार?’ असा प्रश्न विचारुन भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपने मनसे आणि राज ठाकरे यांच्या विरुद्ध एक टीमचं सज्ज केल्याचं वृत्त आहे आणि ते केवळ वेगवेगळ्या माध्यमातून राज ठाकरेंना लक्ष करत राहतील अशी माहिती आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x