5 May 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम
x

भांडुपचे शिवसेना आमदार अशोक पाटील यांना तिकीट नाकारल्याने समर्थकांचा मातोश्रीवर ठिय्या

MLA Ashok Patil, Shivsena, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलण्यात आलं आहे. दरम्यान उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी मातोश्री बाहेर ठिय्या मांडला होता. त्यासोबत भांडुपचे शिवसेना आमदार अशोक पाटील यांना देखील तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांनी मातोश्रीवर ठिय्या धरला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांची अजिबात दखल घेतली नाही.

शिवसेनेत दाखल झालेल्या प्रदीप शर्मा, दिपाली सय्यद या बाहेरून आलेल्या नेत्यांना उमेदवारी जाहीर होत असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देखील शिवसेनेते तिकीट दिले आहे. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी निवड करण्यात आली होती. आता शिवसेनेच्या तिकिटावर ते वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विद्यमान शिक्षणमंत्री आशिष शेलार आमदार म्हणून निवडून गेले होते. मात्र, यंदा हा मतदारसंघ जागावाटपाच्या वाटाघाटीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे तिथून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाजूच्याच वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून आधी शिवसेनेचे बाळा सावंत आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महाडेश्वरांसाठी सेफ मानला जात आहे.

२०१५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी झाल्या होत्या. बाळा सावंत यांचा मृत्यू झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. त्यावेळी मातोश्रीच्या अंगणातच सेनेला धडा शिकविण्यासाठी नारायण राणे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. मात्र तगडा उमेदवार दिल्याने बिथरलेल्या शिवसेनेने भावनिक विषयाला हात घालून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना पुढे करत निवडणूक जिंकली. मात्र आता भावनिक मुद्दा नसल्याने आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कट करून त्याजागी विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून आज अनेक दिग्गज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x