नवी दिल्ली: मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षावर ईव्हीएम’मधील गडबडीवरून विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या उमेदवाराकडे कोणतीही प्रचार यंत्रणा नसताना देखील अनेकजण मोठ्या फरकाने आमदार-खासदार बनत असल्याचा आरोप झाला आहे. भाजप ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका जिंकतं असा आरोप यापूर्वी अनेकवेळेला झालेला असताना भाजपचे अनेक उमेदवार अनेकवेळा ते खुलेआम स्वीकारताना दिसले आहेत.
मागील काही महिन्यांपासून देशभरातील विरोधी पक्ष थेट न्यायालयात देखील गेले आहेत. अनेकांनी मुख्य निवडणूक आयुक्तालयात अधिकाऱ्यांशी यावर चर्चा देखील केली आहे. यावरून सध्या मोठं आंदोलन देखील छेडलं जाण्याची शक्यता असताना आता पुन्हा उद्या मतदान होणार असताना भाजपच्या एका उमेदवाराने थेट ईव्हीएम सेट असल्याचं विधान केल्याने पुन्हा अनेकांना धक्का बसला आहे. देशातील दोन राज्यात म्हणजे हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडत असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र यामुळे विरोधकांची चिंता पुन्हा वाढणार असून निकाल अद्भुत लागल्यास मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे हरयाणात भाजपाला जास्त स्पर्धा नसताना देखील स्थानिक उमेदवार असे दावा करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा निवडणुकांसाठी उद्या एकत्र मतदान होत आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांकडून गुपित प्रचार सुरू असून गावोगावी-घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. हरयाणातील एका भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने ईव्हीएम मशिनसंदर्भात धक्कादायक विधान केलं आहे. असांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीश सिंह विर्क यांनी कमळालाच मतदान करण्याचं धमकीवजा आवाहन केलं आहे.
#HaryanaAssemblyPolls BJP candidate Bakshish Singh gloating over EVMs.. pic.twitter.com/yQInNhhM3h
— Anand Kumar Patel (@patelanandk) October 20, 2019
बख्शीशसिंह यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी बख्शीशसिंह यांनी ईव्हीएम मशिन सेट असल्याचाच सूचवलं आहे. मतदारांना आवाहन करताना, तुम्हीही कुठलंही बटन दाबा, मत कमळाचा पडणार असा दावा विर्क यांनी केला आहे. जर तुम्ही आज चूक केली, तर त्याची सजा तुम्हाला ५ वर्षे भोगावी लागेल. कोणी कुठं मतदान केलं, याची आम्हाला माहिती मिळेलच. जर तुम्ही म्हणाल तर तेही सांगू. मोदी आणि मनोहरलाल यांच्या नजरा तीक्ष्ण असून तुम्ही कुठेही मत द्या, भेटणार तर कमळालाच. तुम्ही कुठलेही बटन दाबा, मत तर कमळाच पडणार, आम्ही मशिन सेट केल्या आहेत, असे खळबळजनक विधान विर्क यांनी केलं आहे. दरम्यान, विर्क यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
