6 May 2024 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Federal Bank Share Price | टॉप बोकरेज फर्मचा फेडरल बँक शेअर्स खरेदीचा सल्ला, पुढे मिळेल मोठा परतावा Ashirwad Capital Share Price | फ्री बोनस शेअर्स मिळवा! स्टॉक प्राईस 5 रुपये, पेनी शेअरची धडाधड खरेदी सुरु Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

केंद्रीय कृषीमंत्री अमित शहा शेतकऱ्यांची भेट घेण्याची शक्यता: मिटकरींकडून खिल्ली

Amit Shah, Devendra Fadnavis, NCP leader Amol Mitkari

मुंबई: सध्या राज्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले असून, आधीच दुष्काळात होरपळला शेतकरी राजा आता ओल्या दुष्काळाने हैराण झाला आहे. एका बाजूला शेतकरी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत असताना राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे कशाचा कशाला पत्ता नाही असंच म्हणावं लागेल.

सध्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी २५ हजार कोटींची मागली केली जात असल्याने केंद्राकडून देखील मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्याअनुषंगाने देशाचे पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री किंवा केंद्रीय अर्थमंत्री यांच्या भेटीगाठी घेणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रातील राजकीय हालचाली पाहता दोन्ही बाजूचे नेते मंडळी कोणाचीही भेट घेऊन त्याचा संदर्भ थेट शेतकऱ्यांशी जोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि प्रसार माध्यमांनी भेटीचे कारण विचारताच फडणवीसांनी सदर भेटीचे कारण शेतकरी आणि ओला दुष्काळाच्या मदतीच्या संदर्भात भेट घेतल्याचं उत्तर दिलं. मात्र त्यांचा दावा प्रशासकीय पातळीवरील पाठपुराव्याच्या बाबतीत हास्यास्पद असल्याची टीका होऊ लागली आहे. कारण त्यानंतर मुख्यमंत्री ना केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे मुख्य सचिव किंवा केंद्रीय अर्थमंत्र्यांना देखील भेटल्याचं पाहायला मिळालं नाही, ज्यामुळे फडणवीसांवर विश्वास ठेवता येईल. वास्तविक केंद्राने पावसाळ्यापूर्वी राज्यात आलेल्या दुष्काळावर मदत न करता ती देखील अजून हवेत आहे. त्यालाच अनुसरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविणारं ट्विट केलं आहे.

त्यात आज काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल देखील दिल्लीत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना भेटले आणि त्यांनी देखील आपण राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रशांवरून गडकरींना भेटलो असं उत्तर प्रसार माध्यमांना दिलं आहे. त्यामुळे आपण शेतकऱ्यांसाठी किती झटतो आहोत आणि आम्हाला सत्ताकारणात काहीच रस नाही असं दाखवण्याच्या केविलवाणा प्रयत्न सध्या दोन्ही बाजूचे करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x