29 April 2024 12:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आणीबाणीवरून काँग्रेसवर आसूड ओढणाऱ्या शिवसेनेला इंदिरा गांधींची आठवण

Shivsena, Indira Gandhi, Sharad Pawar, MahaVikasAghadi

मुंबई: राज्यात सध्या महाविकासआघाडीच्या नावाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार विराजमान होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून इंदिरा गांधींनी लादलेल्या आणिबाणीविरुद्ध अनेकदा आसूड ओढले आहेत. मात्र, बदल्यात राजकारणात सर्वकाही जुळून येताना दिसत आहे. कारण आता शिवसेनेला स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी (Balasaheb Thackeray and Indira Gandhi Meet) यांच्या त्या भेटीची आठवण झाली आहे.

आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची (Uddhav Thackeray Oath as Chief Minister of Maharashtra) शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. त्याअनुषंगाने देश भरतील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रण गेल्याच वृत्त आहे. त्याअनुषंगाने काँग्रेसला शिवतीर्थाच्या प्रवेश (Mumbai Shivtirtha Entry Banners) द्वारावरच काँग्रेस आणि शिवसेनेच्या त्या नात्यांची आठवण देऊशी वाटत असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी शिवाजीपार्क येथे मोठी बॅनरबाजी केली आहे.

कारण राज्याच्यादृष्टीने आज ऐतिहासीक दिवस आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जात महाविकास आघाडी (Shivsena Congress and NCP MahaVikasAghadi Alliance) निर्माण करणारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park Ground) हा भव्य शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी कालपासूनच जय्यत तयारी सुरू आहे, याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री बाहेर व मुंबईभर शिवसैनिकांनी जागोजागी अभिनंदनाचे बॅनर लावले आहेत. शिवसेनाभवनाच्या परिसरात लावण्यात आलेल्या एका बॅनर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबरोबरचे फोटो देखील दर्शवण्यात आले आहेत. ”सत्यमेव जयते मा. बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न साकार, मुख्यमंत्री शिवसेनेचा” असे या बॅनरवर फोटोंबरोबर नमूद करण्यात आलेले आहे. या फोटोद्वारे महाविकास आघाडीचा संदेश देण्यात आल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x