30 April 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
x

सुप्रिया सुळे व आदित्य यांचा महापोर्टलला विरोध; सोबत महाराष्ट्रनामा'कडून ऑनलाईन अभ्यासाची सोय

Sarkari Naukri, Mahapariksha, mahagov, Mahanmk, MPSCkida, MPSCworld, Sarkari Bharti, Police Bharti, Talathi Bharti

मुंबई: अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात राज्य सरकारतर्फे विविध खात्यांच्या भरती प्रक्रिया सुरु झाल्याने उमेदवारांमध्ये नव्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. कारण राज्य शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन नवे आणि त्रुटी नसलेले उत्तम पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.

महायुती सरकारने महापोर्टल सेवा सुरू केली होती. त्याविरोधात राज्यभरातून प्रचंड तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे राज्यभरात ठिकठिकाणी महासेवा पोर्टलविरोधात आंदोलन देखील करण्यात आले होते. निवडणुकी आधी सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रा काढत राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आल्यास महापोर्टल बंद करणार असल्याचे आश्वासन देखील दिले होते.

एका बाजूला या राज्यभरातील तरुण-तरुणींच्या रोजगारासंबंधित घडामोडी सरकार पातळीवर घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रनामा न्यूज’ने राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरबसल्या निरनिराळ्या सरकारी खात्यांच्या भरती संबंधित अभ्यास ऑनलाईन करता यावा यासाठी सुविधा प्राप्त करून दिली आहे. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन सुविधेचा फायदा घेत अभ्यासाला सुरुवात केली आहे आणि कालपासून लाँच झालेल्या या सामाजिक उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर वाढ देखील होतं आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x