17 May 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

VIDEO - खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका न आल्याने गर्भवतीला खांद्यावरून रुग्णालयात आणलं

Tamil Nadu, pregnant lady carried in cloth cradle

तामिळनाडू: रूग्णाला खांद्यावर घेऊन रुग्णालयाकडे घेऊन जाताना अनेकदा पाहिलं असेल. मात्र तामिळनाडूत इरोड येथील गावातील पायाभूत सुविधांच्या बट्याबोलामुळे वेगळीच घटना समोर आली आहे. येथे गर्भवती महिलेला नातेवाईकांनी खांद्यावरून रुग्णालयात पोहोचवलं. कुटुंबाला तब्बल ६ किलोमीटर चालत जावे लागले. त्यानंतर गर्भवतीला रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर तिने मुलाला जन्म दिला आहे.

सोमवारी सायंकाळी कुमारी या गर्भवती महिलेला प्रसूती झाली. तिचा पती मधेशने १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन केला पण पावसामुळे रस्ते पूर्णपणे दुरावस्थेत असल्याने रुग्णवाहिका सुंदरपूरच्या रस्त्यावर येऊ शकली नाही. यानंतर मधेश आणि त्याच्या साथीदारांनी बांबूच्या मदतीने कपड्यांचा पाळणा बतयार केला आणि कुमारीला अडीच तासात ६ किलोमीटरचा प्रवास करत इस्पितळात घेऊन गेले.

कुमारीला तातडीने बारगूर येथील प्राथमिक रुग्णालयात कुटुंबाच्या मदतीने दाखल करण्यात आले आणि तेथेच तिने मुलाला जन्म दिला. सध्या आई आणि मुलाची प्रकृती ठीक असल्याने कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x