30 April 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स आता सुसाट तेजीच्या दिशेने, तज्ज्ञांकडून स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राइस जाहीर Infosys Share Price | इन्फोसिस आणि TCS सह 7 IT शेअर्स मालामाल करणार, मिळेल 39 टक्केपर्यंत परतावा SBI Mutual Fund | अशी म्युच्युअल फंड योजना निवडा, अवघ्या 25 हजार रुपयांची गुंतवणूक देईल 16 लाख रुपये परतावा Guru Rashi Parivartan | 'या' 4 भाग्यवान राशींमध्ये तुमची राशी आहे? 1 मे पासून गुरू रशिपरिवर्तन नशीब बदलणार Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलीकडे आठवलेंनी काहीच केलं नाही: आनंदराज आंबेडकर

Anandraj Ambedkar, Prakash Ambedkar, Union Minister Ramdas Athawale

मुंबई: आनंदराज आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या टीकेला तिखट शब्दांत प्रतिउत्तर दिलं आहे. आंबेडकरी जनतेच्या संदर्भातील सर्वच विषयांवर रामदास आठवले भारतीय जनता पक्षाला पोषक ठरणाऱ्या प्रतिक्रिया नेहमीच देत असताना. मात्र इंदू मिल संदर्भातील त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देण्यात आलं आहे.

रामदास आठवले मुर्ख आहेत. त्यांचा मुर्खपणा सगळ्या जगाला ठावूक आहे. तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत, अशी गंभीर आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम त्यांच्या नातवांमुळेच अडलं आहे, अशा आशयाचं विधान रामदास आठवले यांनी केलं होतं. त्यावर आज आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आठवलेंनी इंदू मिलचं काम बघावं. कसं चाललं आहे, हे बघावं. त्यानंतर त्यांनी बोलावं. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं. रामदास आठवलेंना मी कधीही नेता मानलेलं नाही. जे सत्तेत येतील त्यांचे तळवे चाटण्या पलिकडे या माणसाने काहीही केलेलं नाही. त्यांना जे नेता समजतात ते मुर्खांच्या नंदनवनात जगतात, असंही आनंदराज आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, सध्याच्या राजकीय स्थितीमुळे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय हवाच निघून गेली आहे. त्यात जोगेंद्र कवाडे काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत असताना आणि त्यात रामदास आठवले देखील सध्या भाजपमध्ये असून देखील शरद पवारांच्या घरी घिरट्या मारू लागले आहेत. त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वंचितच्या राजकारणाला नकारात्मक कलाटणी मिळाली आहे. आनंदराज आंबेडकर हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत.

 

Anandraj Ambedkar slams Union Minister Ramdas Athawale over Indu Mill Issue

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x