4 May 2024 4:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीचा मोठा निर्णय, 1 वर्षात 414% परतावा देणारा स्टॉक कोसळणार की तेजीत येणार? Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर पुढे किती फायद्याचा ठरणार? तेजीत येणार? Buy करावा की Sell? Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरची घसरण थांबेना! स्टॉक नेमका घसरतोय का? तपशील जाणून घ्या
x

पोलीस भरती प्रक्रियेत आधी मैदानी चाचणी घ्यावी: खासदार सुप्रिया सुळे

Police Bharti, Police Recruitment, MP Supriya Sule

पुणे: राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातील गेल्या शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करून ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आता या मागणीनुसार कार्यवाही झाल्यास राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळू शकेल.

राज्यातील कायदा आणि सुव्वस्था सुरळीत ठेवण्यात पोलिसांचे मोठे योगदान आहे. यासाठी ते शारीरिदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिस भरती प्रक्रियेतील उमेदवार मैदानी चाचणीद्वारे शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, हे पाहिले जाते. मागील फडणवीस सरकारने मैदानी चाचणीपेक्षा लेखी परीक्षेचे महत्त्व वाढवून भरतीप्रक्रियेत अचानकपणे अन्यायकारक बदल केला.

पोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने बदल केला. शारीरिक चाचणीला कमी महत्त्व देऊन लेखी परीक्षेला अधिक महत्त्व दिले. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर प्रतिकूल परिणाम झाला असून हा निर्णय मागे घ्यावा, असे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेप्रमाणे मैदानी चाचणीसुद्धा १०० गुणांची घ्यावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्यामाध्यमातून न घेता मैदानी चाचणीनंतर लगेचच ऑफलाईन पद्धतीने घ्यावी. भरतीचे वेळापत्रकही वर्षभर आधी जाहीर करावे, आदी मागण्याही सुळे यांनी निवेदनात केल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या प्रमुख मागण्या

  1. पोलिस भरतीची लेखी परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे घेऊ नये.
  2. मैदानी चाचणी झाल्यानंतर ऑफलाइन पद्धतीने लेखी परीक्षा घ्यावी.
  3. मैदानी चाचणीही लेखी परीक्षेप्रमाणे १०० गुणांसाठी व्हावी.

 

Web Title:  Take Physical Ground Test First during Police Recruitment says NCP MP Supriya Sule.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x