5 May 2024 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

धुळे झेडपी: मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्या कृपेने भाजप धुळ्यात विजयी

MLA Amrish Patel, Dhule ZP, Girish Mahajan

धुळे: जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार भारतीय जनता पक्षाकडे वर्ग झाला आणि परिणामी त्याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यामध्ये शिरपूर तालुक्यात ७, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ३ आणि धुळे तालुक्यात १ याप्रमाणे १९ जागांवर विजय संपादन केला. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ जागा तर शिवसेनेने १ जागा मिळविली आहे. याशिवाय अपक्ष १ उमेदवार यात विजयी झाला आहे. उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु आहे.

दुसरीकडे, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ गटांसाठी २७० उमेदवार रिंगणात आहेत. तर १३ पंचायत समित्यांच्या ११६ गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १२ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र २०१९ मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.

 

Web Title:  BJP got majority in Dhule ZP Election because of Amrish Patil.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x