17 April 2021 2:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

नागपूर ZP: गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख विजयी

Salil Deshmukh, Nagpur ZP Election, Home Minister Anil Deshmukh

नागपूर: अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या आतच देशमुख कुटुंबात डबल धमाका झालेला आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सलील देशमुख नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सलील देशमुख हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच पक्षात सक्रिय आहेत. याआधीही अनिल देशमुख यांनी मुलासाठी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मागितलं होतं. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी देशमुख आग्रही होते. परंतु विधानसभावारी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत झेंडा रोवण्यात यश आलं आहे.

जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात धुळे जिल्ह्या परिषदेत ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार भारतीय जनता पक्षाकडे वर्ग झाला आणि परिणामी त्याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यामध्ये शिरपूर तालुक्यात ७, शिंदखेडा तालुक्यात ८, साक्री तालुक्यात ३ आणि धुळे तालुक्यात १ याप्रमाणे १९ जागांवर विजय संपादन केला. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी २ जागा तर शिवसेनेने १ जागा मिळविली आहे. याशिवाय अपक्ष १ उमेदवार यात विजयी झाला आहे. उर्वरीत ठिकाणी मतमोजणी सुरु आहे.

दुसरीकडे, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत.

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक ही भारतीय जनता पक्षासाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ गटांसाठी २७० उमेदवार रिंगणात आहेत. तर १३ पंचायत समित्यांच्या ११६ गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १२ पैकी ११ जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र २०१९ मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.

 

Web Title:  Nagpur ZP election State Home Minister Anil Deshmukh son Salil Deshmukh won.

हॅशटॅग्स

#NCP(341)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x