3 May 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

डीएसके'मधील ठेवीदाराची आत्महत्या; ठेवीदार पुण्यातील 'शिवसैनिक'

Shivsainik Tanaji Korke, DSK Group

पुणे: डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी यांच्या एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके असे या ठेवीदाराचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडी येथील भीमनगर परिसरात राहात होते. त्यांनी मुलीच्या लग्नासाठी डीएसकेमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु, गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपवले आहे. तानाजी कोकरे शिवसैनिक होते. तानाजी यांचे एक पत्र सापडले असून त्यावर शेवटी शिवसैनिक….जय महाराष्ट्र! असा उल्लेख आहे. कोरके यांच्या पश्चात चार मुली आहेत.

२०१४ मध्ये दोन मुलींच्या लग्नासाठी स्वतःच्या नावे चार लाख तर नातवंडांच्या शिक्षणासाठी जावयाच्या नावे पन्नास हजार रुपये रक्कम डीएसके डेव्हलपर्स यांच्याकडे गुंतवणूक केली होती. २०१७ मध्ये त्याची मुदत संपल्यावर रकमेसाठी अनेकदा पाठपुरावा केला. तिसऱ्या मुलीचे लग्न पाहुण्यांकडून उसने पैसे घेऊन केले मात्र चौथ्या मुलीचे लग्नासाठी पैसे कोठून आणायचे या चिंतेपायी आयुष्य संपवत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

तानाजी गणपत कोरके यांनी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी उसने पैसे घेतले होते. मात्र चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. आपल्या आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरण्यात यावं असंही त्यांनी लिहिलं आहे. चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये अशी प्रार्थना मी माझ्या मायबाप सरकारला करत आहे असं म्हटलं आहे.

मुंढवा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली दिसून आली. त्यात त्यांनी डीएसकेमध्ये गुंतवलेले पैसे परत मिळत नाहीत. आणि मुलीचे लग्न करुन शकत नसल्याने आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कोणाला जबाबदार धरु नये, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title:  DSK investor Tanaji Korke from Pune suicide because of not getting money return.

हॅशटॅग्स

#DSK(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x