26 October 2021 4:40 AM
अँप डाउनलोड

कोल्हापूर: हाणामाऱ्या ऐकल्या आता विरोधक नगरसेवकाने घेतला सत्ताधारी नगरसेवकाचा मुका

Congress corporator Sharangdhar Deshmukh, Tararani Aghadi Corporator Kamlakar Bhopale

कोल्हापूर : राज्यभरात अनेक महापालिकांमधील सर्वसाधारण सभा या हाणामारी आणि बाचाबाचीने गाजल्याचं अनेकवेळा समोर आलं आहे. परंतु, तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेत एका नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकाची चक्क भर सभागृहात करकचून पप्पी घेतली. महापालिकेची सभा सुरु असताना भर सभागृहात विरोधीगटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याची पप्पी घेतल्याने सर्वजण अवाक् झाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले. त्यांच्या बाजूला काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अभिनंदनाचे ठराव मांडण्यात आले. यावेळी भोपळे आणि देशमुख यांच्यात संवाद सुरू होता. यानंतर अतिशय आनंदी झालेल्या भोपळेंनी सभागृहाचं कामकाज सुरू असताना देशमुखांच्या गालावर पप्पी दिली.

भोपळे आणि देशमुख यांच्यात नेमकी काय चर्चा सुरु होती? हे समजू शकलेले नाही. परंतु, सभागृहात अशा वागण्यामुळे त्याची उलटसुलट चर्चा सुरु होती. कमलाकर भोपळे हे ताराराणी आघाडीचे नगरसेवक आहेत. मात्र आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीचे नगरसेवक मान देत नाहीत. परंतु काँग्रेस आणि एनसीपी’चे नगरसेवक यांना आपले काम आवडते. ते आपल्याला मान देतात, असेही भोपळे यांचे म्हणणे आहे.

 

Web Title:  Kolhapur Municipal Corporation Tararani Aghadi Corporator Kamlakar Bhopale kissed opposition Congress corporator Sharangdhar Deshmukh.

हॅशटॅग्स

#Maharashtra(204)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x