मुंबई: साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले व त्यास पाथरी व शिर्डीकरांनी संमती दिल्याने वादाला पूर्णविराम मिळाला आहे. शिर्डी ग्रामस्थांचं 30 जणांच्या शिष्टमंडळाने शिर्डी विरुद्ध पाथरी या साई जन्मस्थळ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठकीला उपस्थित होते.

पाथरीला १०० कोटी देण्याचे आम्हाला मान्य आहे. जन्मस्थानाच्या वादावर चर्चा झाली नसल्याचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. १९३० साली दाभोळकृत साईचरित्र लिहीलं ते अधिकृत असून मान्य करावं अशी आमची मागणी होती आणि मुख्यमंत्र्यांना ते मान्य असल्याचे शिर्डीकरांनी सांगितले.

शिर्डी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी जन्मस्थळाबाबतचं वक्तव्य मागे घेतलं. तर पाथरीच्या तीर्थस्थळ विकासालाही निधी देण्याचं मंजूर करण्यात आलं. या दोन मुद्द्यावरुन आंदोलन मागे घेत असल्याची भूमिका शिर्डीकरांनी जाहीर केली.

 

Web Title:  Sai Babas birthplace row Shirdi villagers satisfied with Chief minister Uddhav Thackeray’s assurance.

पाथरीचा विकास साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नव्हे तर तीर्थक्षेत्र म्हणून आश्वासन: उद्धव ठाकरे