5 May 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा
x

गृहमंत्रालयाच्या उत्तराने गृहमंत्री तोंडघशी; 'तुकडे-तुकडे गँगची माहिती नाही' असं RTI'ला उत्तर

RTI, Union Home Ministry, Tukde Tukde Gang, Amit Shah

नवी दिल्ली: देशात ‘टुकडे-टुकडे गँग’ सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर माजी पत्रकार व कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर गृह मंत्रालयाने दिले आहे. ‘टुकडे-टुकडे गँग’ देशातील अशांततेला जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. या अनुशंगानेच गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अनेकदा भाषणामध्ये ‘तुकडे तुकडे गँग’चा देशात विभाजन घडवण्याचा डाव आहे अशी टीका केली जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये २०१६ साली झालेल्या सरकारविरोधी आंदोलनानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून ‘तुकडे तुकडे गँग’ हा उल्लेख वरचे वर होऊ लागला. याचसंदर्भात गोखले यांनी महिती अधिकार हक्काअंतर्गत अर्ज करुन ‘तुकडे तुकडे गँग’बद्दल सरकारकडे असणारी माहिती उघड करावी अशी मागणी केली होती.

जेएनयू विद्यालयातील विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न केला होता. काही वर्षांपूर्वी कन्हैया कुमार याचं प्रकरण गाजल्यानंतर भारतीय जनता पक्षाने याला मोठा धार्मिक रंग दिला होता. विशेष म्हणजे न्यायालयाने देखील सर्व पुराव्यानंती कन्हैया कुमारला निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यानंतर CAA आणि NRC वरून देशभरात आंदोलनं पेट घेताच भाजपने देशाचं लक्ष जेएनयू’वर केंद्रित करण्यासाठी सगळा खेळ रचला असा आरोप देखील विरोधकांनी केला होता. मात्र भारतीय जनता पक्षाचे नेते पुन्हा पुन्हा ज्या ‘तुकडे तुकडे’ गॅंगचा उच्चार भाषणात करतात ती खरोखर अस्तित्वात आहे अशी विचारणा जेव्हा खुद्द अमित शहांच्या गृहमंत्रालयाला विचारण्यात आले तेव्हा मात्र उत्तराने भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचं म्हटलं जातं आहे.

 

Web Title:  We do not have information about Tukde Tukde Gang Union Home Ministry reply to RTI Question.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x