2 May 2024 8:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे: राहुल गांधी

Kerala congress MP Rahul Gandhi, Kalpeta

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत फारसे अंतर नाही. ती एकच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. वायनाडच्या कलपेटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली. या महारॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज वायनाडच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये संविधान बचाओ सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी गांधी हत्येचा धागा पकडून नरेंद्र मोदींवर निषाणा साधला. ”महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारसरणी एकच आहे. त्यात काहीच फरक नाही. केवळ माझी नथुराम गोडसेवर श्रद्धा आहे, हे सांगण्याची हिंमत नरेंद्र मोदींमध्ये नाही,” असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

भारतीयांना भारतीय असल्याचे सिद्ध करण्यास भाग पाडण्यात येत असून भारतीय कुणाला म्हणायचं हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण? असा सवाल राहुल गांधींनी विचारला. माझं भारतीयत्व विचारण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला? असं विचारत मी भारतीय आहे हे मला माहितेय आणि ते कुणाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही असे राहुल म्हणाले. त्याचप्रमाणे १.४ अब्ज भारतीयांना ते भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

Web Title:  Kerala congress MP Rahul Gandhi leads save the constitution March at Kalpeta.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x