शर्जीलला हवा इस्लामी भारत; पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC)च्या विरोधात निदर्शनं करताना चिथावणीखोर भाषण करणारा ‘जेएनयू’चा विद्यार्थी शर्जील इमाम याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती पुढं आली आहे. ‘शर्जील हा कट्टरतावादी विचारसरणीकडं झुकलेला असून भारत इस्लामी राष्ट्र व्हावं असं मानणाऱ्यांपैकी आहे,’ अशी कबुली त्यानं पोलिसांना दिल्याचं सूत्रांकडून समजतं.
सध्या शरजील इमाम पोलिसांच्या रिमांडमध्ये आहे. अनेक कट्टरपंथीच्या प्रभावाखाली शरजील असल्याने त्याला अटक झाल्याचा कोणताही पश्चाताप नाही असं पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार शरजील इमाम हा धर्मासाठी कट्टर आहे. त्याला भारताला मुस्लिम राष्ट्र बनवायचं आहे. तसेच त्याचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कुठेही छेडछाड करण्यात आली नाही हे त्याने कबूल केलं आहे. सध्या त्याच्या व्हिडीओची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये केली जात आहे.
Delhi Police Sources: Interrogation has revealed that Sharjeel Imam is highly radicalized and believes that India should be an Islamic state, he has also admitted that no tampering has been done with the videos of his different speeches.
— ANI (@ANI) January 30, 2020
शरजीलचा मित्र इम्रानला ताब्यात घेण्यात आले असता चौकशी केली तेव्हा शरजीलच्या प्रेयसीची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तिला गाठून तिच्यावर दबाव निर्माण केला आणि शरजीलला भेटण्यासाठी तिला सांगितलं. शरजील आपल्या गर्लफ्रेंडच्या घरी तिला भेटायला जाताच पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईत स्थानिक पोलिसही दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकासमवेत होते. शरजील इमामला अटक करणार्या पोलीस पथकाचे प्रमुख दिल्ली पोलिसांचे डीसीपी गुन्हे शाखा राजेश देव होते.
पोलिसांनी पहाटे ४ वाजता मुझम्मिलच्या घरावर छापा घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतरच शारजीलचा थांगपत्ता लागल्याचे सांगण्यात आले. परंतु, शारजील स्वत: दिल्ली पोलिसांपुढे शरण आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, शरजीलला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
Web Title: India should be Islamic Country Sharjeels investigation reveals shocking information.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट