19 April 2024 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

शेतकरी आंदोलन अधिकच उग्र होतंय | गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक

Union Home Minister Amit Shah, famers protest, News Farm Laws

नवी दिल्ली, १३ डिसेंबर: नव्या केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात (New Agriculture Laws) शेतकऱ्यांचा जोरदार हल्लाबोल सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात (Delhi Border Farmers Protest) प्रत्येक राजकीय पक्ष आपला झेंडा सर्वात उंच ठेवू इच्छित आहेत. यावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले जात आहेत. इतकेच नाही, तर अन्नदात्यांच्या हे आंदोलन सुरू असताना देशातील प्रसिद्ध व्यक्ती देखील या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच उग्र होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि कृषी राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. केंद्र सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढायचा आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी उद्या (सोमवार) एका दिवसाचा उपवास करणार असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना उद्याचा दिवस उपवास करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

दुसरीकडे देशाच्या राजधानीत एकिकडे शेतकरी आंदोलन सुरु आहेत, तर दुसरीकडे दिल्लीच्या राजकारणात हाय व्होल्टेज ड्रामा होताना दिसतोय. आपच्या आमदार आतिशी आणि राघव चड्ढा (AAP MLA Raghav Chadha) यांच्यासह आम आदमी पार्टीचे (AAP) अनेक नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरासमोर आंदोलनाला जात असताना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

News English Summary: As the farmers’ agitation intensified, Union Agriculture Minister Narendra Singh Tomar and Minister of State for Agriculture Somprakash held a meeting at the residence of Union Home Minister Amit Shah. The central government wants to find a way by discussing with the farmers as soon as possible.

News English Title: Union Home Minister Amit Shah called important meeting over famers protest in Delhi news updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x