17 April 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 17 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या IDFC First Bank Share Price | बँक FD असा परतावा देणार नाही! पण या बँकेचा शेअर अल्पावधीत देईल 50 टक्केपर्यंत परतावा Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! या टॉप 3 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 57 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअरमध्ये मोठी घसरण होणार? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? अपडेट आली Lloyds Metal Share Price | कुबेर कृपा करणारा 11 रुपयाचा शेअर, गुंतवणूकदार 3 वर्षात करोडपती झाले, खरेदी करणार? TCS Share Price | तज्ज्ञांकडून टीसीएस शेअर्सला 'ओव्हरवेट' रेटिंग, जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस
x

नवी मुंबईत भाजपाला खिंडार पडणार; १५ नगरसेवक राष्ट्रवादी-शिवसेनेत प्रवेश करणार

BJP Leader Ganesh Naik, Navi Mumbai

नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवी मुंबईत गणेश नाईक यांना पक्षात आणून संपूर्ण शहरात शिवसेनेला एकही जागा दिली नव्हती. त्यामुळे सध्या नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये शिवसेना सत्तेच्या जोरावर पक्ष विस्तार करण्याची योजना आखात आहे आणि त्यात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने त्याला प्राधान्य दिल आहे.

त्यासाठी गणेश नाईक यांचे भाजपात गेलेले समर्थक पक्षात आणण्याची योजना आखली आहे. त्यासाठी शिवसेनेतील मोठ्या नेत्यांवर जवाबदारी देऊन गणेश नाईक समर्थक नगरसेवकांशी संपर्क सुरु झाला आहे. मात्र यामध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीची देखील साथ मिळाली असून आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची योजना दोन्ही पक्ष आखात असल्याचं वृत्त आहे. त्यानुसार दोन्ही पक्षातील मंत्रिपदावरील नेते देखील प्रत्यक्ष लक्ष ठेऊन आहेत असं खात्रीलायक वृत्त आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला खिंडार पडणार असल्याची माहिती आहे. कारण भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत पालिकेवर एनसीपी’ची सत्ता जात भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला. पण आता भारतीय जनता पक्षाचे १५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एनसीपीतून गणेश नाईकांसोबत भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले १५ नगरसेवक घरवापसी करणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाशी काडीमोड घेत शिवसेनेनं एनसीपी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना आणि एनसीपी मिळून नवी मुंबई भारतीय जनता पक्षाला खिंडार पाडण्याच्या तयरीत आहे.

 

Web Title:  Navi Mumbai BJP corporators will join NCP and Shivsena Party before Navi Mumbai Corporation Election .

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x