15 December 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

महागाई विरोधात भारत बंद; सत्तांतर निश्चित होणार : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत देशात राजकीय सत्तांतर निश्चित असून विरोधकांनी सर्व मतभेद विसरून एकत्र यावं’, असं आवाहन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील भाषणादरम्यान केलं आहे. पेट्रोल तसेच डिझेलच्या आणि एकूणच इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने धरणं आंदोलन सुरु केलं असून त्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा सहभागी झाले आहेत.

सध्या इंधन दरवाढ आणि एकूणच प्रचंड वाढलेले महागाई बघता काँग्रेसने देशभर त्याविरोधात भारत बंद’चा नारा दिला असून त्याला देशभरातील २१ पक्षांनी पाठिंबा दिला आहे. सर्वप्रथम आज सकाळी राहुल गांधी तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी राहुल गांधींनी मानससरोवरयेथून आणलेलं पवित्र जल महात्मा गांधीच्या समाधीवर अर्पण केलं. त्यानंतर राहुल गांधींनी इंधन दरवाढी विरोधात रामलिला मैदानापर्यंत मार्चला सुरुवात केली आणि भाजप विरुद्धच्या भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

त्यावेळी देशभरातील विविध पक्षांचे नेते दिल्लीत उपस्थित होते. या मार्चमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते शरद यादव, तारिक अन्वर, राजदचे नेते मनोज झा, जेडीएसचे नेते दानिश अली, आरएलडीचे नेते जयंत चौधरी आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंहही सहभागी झाले होते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही या बंदमध्ये सहभाग घेतला होता.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x