11 May 2024 12:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे Amazon Sale | सॅमसंग, रियलमी आणि रेडमी 5G स्मार्टफोन 12,000 रुपयांनी स्वस्त, ऑफरवर तुटून पडले ग्राहक Smart Investment | पगारदारांनो! बचत रु.100, जमा होतील 10 लाख 80 हजार रुपये, परतावा मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये Post Office Scheme | या आहेत पोस्ट ऑफिसच्या 4 सुपरहिट योजना, जबरदस्त कमाईसह मिळेल मोठा परतावा Numerology Horoscope | 11 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल
x

शुल्लक भांडणावरून पत्नीचं मुंडकं कापून थेट पोलीस ठाण्यात पोहोचला

Uttar Pradesh, Barabanki gaon, Man cut off head of wife

बाराबंकी: उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे शुल्लक घरगुती वादात पतीने पत्नीची हत्या केली आणि तिचा थेट शिरच्छेद केला आणि पोलिस स्टेशन गाठले. त्या युवकाला पाहून पोलिस कर्मचारीही बुचकळ्यात पडले होते. अखिलेश रावत असे आरोपीचे नाव आहे. तो बाराबंकीच्या जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरातील बहादूरपूर गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पत्नीचं मुंडकं जहानगीराबाद पोलिस ठाण्यात नेले होते.

तो पोलीस स्टेशनमध्ये आला तेव्हा पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी त्याच्यापासून त्याच्या पत्नीचं मुंडकं काढून घेण्याचा प्रयत्न करताच त्याने राष्ट्रगीत आणि भारत माता की जय अशा घोषणा देण्यास सुरुवात केली असं पोलीस म्हणाले. त्यानंतर बरीच मेहनत घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीचे डोके त्याच्या हातातून मुक्त केले. मात्र काही वेळातच आरोपीच्या विकृतीची दहशत आसपासच्या परिसरात पसरली होती.

पोलिस अधीक्षक डॉ. अरविंद चतुर्वेदी यांनी सांगितले की, घरगुती वादात या तरूणाने आपल्या पत्नीचे शिरच्छेद केला आणि ते मुंडक घेऊन तो पोलिस ठाण्यात पोहोचला होता. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

 

Web Title:  Man cut off head of wife in Uttar Pradesh Barabanki gaon.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x