28 April 2024 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

जे माझ्या वडिलांनी शिकवलेलं ते हे हिंदुत्व नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray, BJP, HIndutva

मुंबई: सध्या देशभर CAA वरून आंदोलनं पेटलेली असताना आणि काँग्रेससहित अनेक पक्ष त्या कायद्याला विरोध करत असताना शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्याचे काँग्रेस नाराज होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा एकप्रकारे काँग्रेसला धक्का असल्याचं मानलं जातं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेकडे काँग्रेस कसं पाहणार ते पाहावं लागणार आहे. कारण CAA अंतर्गत बाहेरील निर्वासित हिंदूंना भारतात नागरिकत्व देणार असल्याने शिवसेनेने स्वतःचा स्वार्थ साधला असून, देशभरातील मुस्लिम समाजाची आणि आंदोलकांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय तज्ज्ञांना वाटतं. कदाचित हाच संदेश दिल्ली दरबारी पोहोचेल आणि यावरून भाजप देखील शिवसेनेला राजकीय कोंडीत पकडेल अशी शक्यता आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपाला देखील लक्ष केलं आहे. ‘जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का’, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर जोरदार प्रहार केले. हे हिंदुत्व नसेल तर मी कुणापासून फारकत घेतली. हे माझे समविचारी आहेत काय? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही.

माझं हिंदु राष्ट्र, हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही. माणसं माणसाला मारतील हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, असे टोल्यावर टोले हाणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘हिंदुत्वावर’ जहाल टीका केलीय.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) हा कायदा केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे जर भाजपानं हा कायदा अंमलात आणायचा ठरवलं तर त्यामध्ये केवळ मुसलमानच नाही तर हिंदूही भरडले जातील. सर्वच धर्मांतील लोकांना याचा त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे. मी मुख्यमंत्री असलो आणि नसलो तरी माझं धोरणं स्वच्छ आहे की मी एनआरसी होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

सत्तेमध्ये एकत्र आहात. सत्तेसाठी एकत्र राहाल…पण ही महाविकास आघाडी भविष्यातसुद्धा पुढे जाईल का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “जायला काय हरकत आहे? आणि न जावं असं कारण काय? जर तिघांनी एकमेकांच्या मर्यादा ओळखल्या असतील आणि तशा त्या ओळखल्या आहेतच, तर आपल्या मर्यादेमध्ये जास्तीत जास्त टप्पा किंवा दरमजल सहज साध्य करू शकतो. पण एखादा आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काही करायला गेला तर तो आपटतो असं देखील ते म्हणाले.

अनेक राज्यांनी या कायद्याविरोधात ठरावही मंजूर केलेत. त्यामुळे महाराष्ट्र काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. देशभर वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, NRC आणि CAA हे वेगळे विषय आहेत. NRCचं अजुन काहीच नाहीये. गृहमंत्री अमित शहांनी हे येणार नाही असंच सांगितलंय. पण NRC आलाच तरीही आम्ही तो महाराष्ट्रात येवू देणार नाही. NRC हा हिंदुच्याही मुळावर येणार आहे हे लक्षात ठेवा. सगळ्यांनाच आपलं नागरीकत्व सिद्ध करावं लागणार आहे. तर CAA हा कुणाचं नागरीकत्व हिरावून घेणारा कायदा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शेजारी देशातून जे शरणार्थी आलेले आहेत त्यांना नागरीकत्व देणारा हा कायदा आहे.

 

Web Title:  This is not Hindutva which I learned from my Father says CM Uddhav Thackery to slam BJP.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x